Thursday, May 7, 2026
HomeराजकीयAnjali Damania : अंजली दमानिया यांचा अजित पवार यांच्यावर संताप; म्हणाल्या, "पार्थ...

Anjali Damania : अंजली दमानिया यांचा अजित पवार यांच्यावर संताप; म्हणाल्या, “पार्थ पवार कुकूलं बाळ नाहीत, त्यांनी…”

मुंबई । Mumbai

पुणे शहरातील मुंडवा येथील ‘अमेडीया’ (Amedia) कंपनीच्या ४० एकर जमीन विक्री प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing – EOW) शीतल तेजवानी हिला अटक केली आहे. ही कंपनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे.

- Advertisement -

या जमीन गैरव्यवहार प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच एक महत्त्वपूर्ण विधान केले. या व्यवहाराच्या वेळी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे आणि काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यास त्वरित भूमिका घेणे आवश्यक होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. “अधिकाऱ्यांकडून वेळेत योग्य ती कारवाई झाली असती, तर पुढील प्रकार घडलाच नसता,” असे अजित पवार म्हणाले. या वक्तव्यातून ते या संपूर्ण प्रकरणाचे खापर आता अधिकाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे स्पष्टपणे दिसून येते.

दरम्यान, अजित पवार यांच्या या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विधानावर टीका करताना म्हटले की, “लहान मुले शाळेत भांडण करतात, तेव्हा शिक्षक त्यांना थांबवतात, असे वाटते. अजित पवारांचे विधानही मला काहीसे तसेच वाटत आहे.”

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “त्यांचा पार्थ पवार काही ‘कुकुलं बाळ’ नाही.” पार्थ पवार यांनी केलेले कृत्य ही साधी चूक नसून तो फसवणूक (Fraud) आहे. दमानिया पुढे म्हणाल्या की, पार्थ पवार यांनी एकदा नव्हे, तर अनेक कागदपत्रे बदलून सुरुवातीला सप्लीमेंट एलएलपी (Supplement LLP) बनवले, रेझोल्युशन पास केले, खोटा एलओआय (LOI) घेतला, त्यानंतर अॅडज्युडिकेशन केले, सेल डीड केले आणि त्यानंतर जमिनीचा ताबा (Possession) मिळवण्यापर्यंत सगळे केले आहे. त्यामुळे हे एक मोठे फ्रॉड आहे.

“तो तुमचा पूर्ण मोठा झालेला मुलगा आहे. त्यामुळे यात अधिकाऱ्यांची चूक नाही,” असे ठणकावून सांगत अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. जर त्यांना आपल्या मुलाची चूक दिसत नसेल, तर त्यांनी “त्याची दृष्ट काढा आणि त्याला घरात बसवा. आम्हाला जे लढायचे आहे, ते आम्ही लढणार आहोतच,” असेही अंजली दमानिया यांनी ठामपणे सांगितले.

या जमीन गैरव्यवहारामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे या प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : निर्मळपिंपरी बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणी श्रीरामपुरातील डॉ. कुटेसह दोन...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळपिंपरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या गंभीर आणि समाजघातक रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घालत, श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठीत...