Wednesday, September 30, 2026
HomeनाशिकNashik News: तपोवन बचाव आंदोलनात दिव्यांग बांधवांचा सहभाग; झाडे तोडण्याच्या निर्णयाला जोरदार...

Nashik News: तपोवन बचाव आंदोलनात दिव्यांग बांधवांचा सहभाग; झाडे तोडण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध

नाशिक | प्रतिनिधी
तपोवन परिसरातील झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करून ‘प्रदर्शन केंद्र’ प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ‘झाडे वाचवा तपोवन वाचवा नाशिक वाचवा’ या जनआंदोलनात नाशिक शहर व जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

तपोवन येथे दिव्यांग बांधवांनी रॅली काढत जोरदार घोषणाबाजी केली. पर्यावरण संवर्धन आणि हिरवाई टिकवून ठेवण्यासाठी एकही झाड तोडता कामा नये, असा ठाम संदेश या रॅलीतून देण्यात आला.

- Advertisement -

या वेळी दत्तु बोडके म्हणाले की, रामायणात प्रभू श्रीरामांना रावणाचा नाश करण्यासाठी वानर सेनेने जशी साथ दिली, त्याचप्रमाणे तपोवनच्या रक्षणासाठी दिव्यांग बांधवांनी पुढाकार घेतला आहे. साधू-संतांच्या नावाखाली सरकार व महानगरपालिका करीत असलेल्या ‘प्रदर्शन केंद्र’ प्रकल्पाला आम्ही ठामपणे विरोध करतो. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर सरकार व महानगरपालिकेने झाडे तोडण्याचा निर्णय रद्द केला नाही आणि प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला तत्काळ स्थगिती दिली नाही, तर दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने महानगरपालिका आयुक्त कार्यालय, राजीव गांधी भवन येथे आंदोलन करतील.

या आंदोलनात रवींद्र टिळे, संतोष मानकर, ललित पवार, बबलू मिर्झा, बच्चु निकाळजे,ललिता पवार, दत्तू बोडके, अनिल भडांगे, विशाल पाटील, नितीन गवळी, प्रमोद केदारे, सोमनाथ नागरे, राजू देसले, प्रभाकर धात्रक, तल्हा शेख, हिरामण मनोहर, ओमकार वेळमकर, विजय सोनार, राजेंद्र गायकवाड, संजय पवार, वंदना शिंदे, वैशाली चव्हाण, मनीषा स्वामी, दिनेश स्वामी, पी.एच. जोशी, हिरामण गोड, राहुल मुदकर, विजय वाळवे, मतेनकर, पुष्पलता देवरे यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व नागरिक उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Crime News : दरोड्याच्या तयारीत तिघे जेरबंद; दोघे पसार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाट्याजवळील आराध्या पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, हॉटेल बजरंगच्या बाजूला दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून गावठी कट्टा,...