Thursday, April 30, 2026
Homeक्राईमPathardi : पाथर्डीत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी

Pathardi : पाथर्डीत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरात शनिवारी(दि.21) रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत चार ठिकाणी घरफोड्या केल्याची घटना घडली असून, यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एडके कॉलनी आणि कसबा परिसरात झालेल्या या चोरीच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एडके कॉलनी परिसरात युवराज सिताराम वायळ (वय 43, व्यवसाय शिक्षक) यांच्या घरासह आणखी दोन ते तीन ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्या. वायळ हे कुटुंबासह गावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटांची उचकापाचक करून सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम चोरून नेल्याचे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे.

- Advertisement -

यामध्ये मनी मंगळसूत्र (20 ग्रॅम), मिनी गंठन (5 ग्रॅम), चांदीची चैन आणि सुमारे 8 हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना 17 मार्च ते 21 मार्च दरम्यान घडल्याचे स्पष्ट झाले आहे. शेजारी अजय सुसलादे यांनी घराचे कुलूप तुटलेले पाहून वायळ यांना माहिती दिल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, शेजारी राहणार्‍या भारती कचरू ढाणके यांच्या घरातही चोरी झाल्याचे समोर आले आहे. कसबा परिसरातील ब्राह्मण गल्ली येथे राहणारे शाहू फरताळे यांचे घरही चोरट्यांनी फोडले. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वीही त्यांच्या घरात घरफोडी झाली होती. मात्र यावेळी चोरट्यांना कोणताही ऐवज हाती लागला नाही. तरीही या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

शहरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्या तरी अनेक प्रकरणांचा तपास लागलेला नाही आणि काही प्रकरणांमध्ये तपास लागला तरी चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळत नाही. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. सलग घरफोड्यांच्या घटनांमुळे पाथर्डी शहरात पुन्हा चोरीचे सत्र सुरू झाल्याची चर्चा रंगली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले असून त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले व पाठीवर बॅग लटकवलेली स्पष्टपणे दिसत आहे. एका चोरट्याने कुत्रा भुंकू नये म्हणून त्याच्यावर दगड फेकल्याचेही दृश्य कॅमेर्‍यात टिपले गेले आहे. तसेच एका चोरट्याच्या हातात शस्त्र असल्याचेही दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : भंडारदराच्या पाणी चोरीवर उच्च न्यायालयाचा दणका

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur भंडारदरा धरणाच्या पाणी वाटपात होणारी प्रचंड चोरी आणि नादुरुस्त मोजमाप यंत्रणेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला कठोर शब्दांत फटकारले आहे....