Thursday, May 2, 2024
Homeनगरपाथर्डीत जिल्हाधिकार्‍यांची धडक कारवाई

पाथर्डीत जिल्हाधिकार्‍यांची धडक कारवाई

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

करोनाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून शासकीय नियमाचे पालन न करणार्‍या पाथर्डी शहरामधील अजंठा चौकातील व्दारका मेडिकल,चंदन मेडिकल,पटवा किराणा तर उपजिल्हा रुग्णालय समोरील रविराज भोजनालय, जगदंबा सलून, तारकेश्वर कृषी सेवा केंद्र या सहा दुकानांमध्ये करोना नियम पाळण्यात न आल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी धडक कारवाई करत दुकाने सील करण्याचे आदेश पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिले.

- Advertisement -

पाथर्डी परिषदेचे गौरव आदिक, दत्तात्रय ढवळे, महेश कवादे, सोमनाथ गर्जे, अशोक डोमकावळे, लखन दिनकर, खंडू दिनकर, शुभम काळे यांच्या पथकाने ही दुकाने 7 दिवसांसाठी सिल करण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. करोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. अनेक गावे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काल जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे मोहटादेवी गडावर बैठकीसाठी जात असताना पाथर्डी शहरात त्यांना काही दुकानांत करोना नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले. स्वतःया अधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरुन दुकानांची पाहणी केली त्यानंतर कारवाई करत नगरपरिषदचे मुख्य अधिकारी संतोष लांडगे यांना आदेश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या