Thursday, October 22, 2026
HomeनगरBribery News : अडीच लाखांची लाच; पोलीस एसीबीच्या जाळ्यात?

Bribery News : अडीच लाखांची लाच; पोलीस एसीबीच्या जाळ्यात?

अधिकृत गुन्हा दाखल नसल्याने संभ्रम

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचार्‍याला लाच स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी पकडल्याची माहिती आहे. एका गुन्ह्याच्या प्रकरणात सुमारे पाच लाख रुपयांची मागणी केल्याची चर्चा असून, तडजोडीनंतर अडीच लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचार्‍याने गुन्ह्याच्या प्रकरणात मोठ्या रकमेची मागणी केली होती.

- Advertisement -

तडजोडीनंतर अडीच लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार नाशिकच्या पथकाने सापळा रचून पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही कारवाई केल्याची माहिती आहे. कारवाईनंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. संबंधित कर्मचारी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मर्जीतील असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात असल्याने कारवाईची अधिक चर्चा झाली.

लाच स्वतःसाठी मागितली होती की अन्य कोणाच्या सांगण्यावरून स्वीकारली, याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असल्याचे समजते. या प्रकरणाच्या अनुषंगाने अधिकार्‍यांनी काही ठिकाणी छापे टाकल्याचीही माहिती आहे. दरम्यान, शनिवारी रात्री नऊ वाजेपर्यंत संबंधित प्रकरणात कोणालाही अटक झाल्याचे किंवा अधिकृत गुन्हा दाखल झाल्याचे स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच कारवाईचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

Crime News : सैन्यभरती फसवणूक प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सैन्यदलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरूणांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण गंभीर बनले असून, या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे...