Friday, May 3, 2024
Homeनगरपाथर्डी सराफ हल्ला प्रकरणी दोघा संशयितांना अटक

पाथर्डी सराफ हल्ला प्रकरणी दोघा संशयितांना अटक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरातील सराफ व्यावसायिकाला धारदार शास्त्राने डोक्याला गंभीर दुखापत करून लुटणार्‍या तीन संशयितांच्या पाथर्डी पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या विरोधात झालेल्या मोर्चा नंतर चोवीस तासाच्या आत तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

विशाल शिवाजी एडके (रा.पाथर्डी), दिपक दत्तात्रय राख (रा.अहमदनगर), दीपक तोताराम सोमनकर (रा.रघुहिवरे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून या तीघांनाहीवेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या वेळी अनोळखी तीन चोरट्यांनी शहरातील सराफ व्यावसायिक बंडू उर्फ राजेंद्र चिंतामणी यांच्या डोक्यावर धारदार शास्त्राने वार करून त्यांना जखमी केले होते.

तसेच त्यांच्या दुचाकी असलेली स्कूटी गाडीतील पिशवी काढून घेतली व तिथून पसार झाले होते. या घटनेनंतर शहरातील व्यापारी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी पाथर्डी पोलिसांच्या विरोधात मोर्चा काढत पोलिसांच्या कारभाराविषयी ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केला होती. त्यानंतर गुन्हाचे गांभीर्य ओळखून शनिवारी ही पोलिसांनी कामगिरी केली. हा गुन्हा चोरीच्या उद्देशाने केल्याचे प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

गुन्हा घडल्यानंतर संशयाची सुई नातेवाईकांकडे जात होती मात्र पोलिसांनी योग्य तपास करून यात खर्‍या आरोपींना गजाआड करण्याचे काम केले आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, सचिन लिमकर, कर्मचारी भगवान सानप, ज्ञानेश्वर रसाळ, संदीप कानडे, देविदास तांदळे, निलेश म्हस्के, अतुल शेळके, राहुल तिकोणे, लक्ष्मण पवार, कुमार कराड, किशोर पालवे, कृष्णा बडे, संदीप गर्जे, या पोलीस पथकांनी ही कारणीगिरी केली. या घटनेत इतर कोणी सामील होते काय याचा तपास पोलीस घेत आहेत.

पिशवीत निघाल्या चाव्या

सोन्या चांदीचे व्यावसायिक बंडू उर्फ राजेंद्र चिंतामणी हे नेहमीप्रमाणे आपल्या दुकानातून घराकडे दुचाकीवर जात असत. दुकान बंद करताना एक पिशवी त्यांच्याकडे असते. संशयितांना त्या पिशवीत सोने असल्याची खात्री होती. यामुळेचघटनेच्या दिवशी चोरांनी त्यांच्या हल्ला करत ती पिशवी नेली. परंतु चिंतामणी यांच्या प्रसांगवधानाने चोरांच्या हाती फक्त दुकानाच्या चाव्या लागल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या