Friday, May 3, 2024
Homeनाशिकमहिलेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारास अटक

महिलेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारास अटक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नवीन नाशकातील New Nashik पवन नगर Pavan Nagar येथे एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचत रात्रीच्या वेळी सीबीएस बस स्थानका जवळून ताब्यात घेतले.

- Advertisement -

नवीन नाशकातील पवन नगर येथे एका महिलेवर खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर सुटलेल्या एका गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

याबाबत विविध राजकीय संघटनांनी अंबड पोलिसांना Ambad Police सदर संशयिताला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. यावरून पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकांना शोध कार्यासाठी कामाला लावले होते.

दरम्यान सदर प्रकरणातील संशयित नितीन पवार हा नाशिक सोडून पळुन जात असल्याच्या तयारीत असताना मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वपोनी आंचल मुदगल यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या