Friday, May 3, 2024
Homeनगरअ‍ॅपे रिक्षाच्या धडकेने अपंग पादचारी शेतमजूर ठार

अ‍ॅपे रिक्षाच्या धडकेने अपंग पादचारी शेतमजूर ठार

घारगाव |वार्ताहर| Ghargav

अ‍ॅपेरिक्षाने जोरदार धडक दिल्याने संगमनेर तालुक्यातील कौठे बुद्रुक येथील एक तरुण अपंग शेतमजूरचा मृत्यू झाला. ही घटना घारगाव-कौठे रस्त्यावर रासकाई मंदिर परिसरात शनिवारी (26 फेब्रुवारी) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

संतोष मुरलीधर दुधवडे (वय 32), असे अपघातात मृत्यू झालेल्या अपंग शेतमजुराचे नाव आहे. घारगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष दुधवडे हा शेतातील काम आटोपून रस्त्याच्या कडेने घरी पायी निघालेला होता. इतक्यात घारगावकडून कोठ्याकडे जाणारी अ‍ॅपे रिक्षा (एमएच-12 जीटी-6301) आली. तेव्हा चालक आरोपी रामभाऊ किसन शिर्के (रा. कुंभार हिवरे, ता. शिरूर, जि. पुणे) याला रिक्षावर ताबा मिळवता न आल्याने संतोष दुधवडे याला धडक बसली.

या अपघातात संतोष हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू खेडकर, पोलीस नाईक गणेश लोंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत संतोष याचा भाचा अशोक अंकुश मधे (रा. बाळंद्री, ता. संगमनेर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

रिक्षा चालक रामभाऊ शिर्के हा अपघातानंतर रिक्षा घेऊन पसार झाला. तो कौठे बुद्रुक येथे जाऊन थांबला. घारगाव पोलीस ठाण्यात रामभाऊ शिर्के विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या