Thursday, May 2, 2024
Homeजळगावदिरंगाईने काम करणाऱ्या 370 मक्तेदारांना दंडात्मक नोटिसा   

दिरंगाईने काम करणाऱ्या 370 मक्तेदारांना दंडात्मक नोटिसा   

 जळगाव jalgaon :

जिल्ह्यात जलजीवन मिशन (Jaljeevan Mission)अंतर्गत 1 हजार 435 हून अधिक पाणी योजना मंजूर ()Water plan approved असून त्यापैकी जिल्ह्यात 370 पाणी योजनांचे काम दिरंगाईने (Work late) सुरू आहे. तसेच त्यातील काही पाणी योजनांचे कामच सुरू झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पाणी योजनांच्या 370 मक्तेदारांना (monopolists) कामांतील दिरंगाईप्रकरणी जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून (Rural Water Supply Department) दंडात्मक नोटीसा (Penalty Notice) बजावण्यात आल्या आहेत. 

- Advertisement -

व्वा रे, विद्यापीठाचा कारभार! MBA च्या
परीक्षेत जुनीच प्रश्नपत्रिका…

जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला पाणी मिळावे , यासाठी महत्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. आता तोंडावर पावसाळ्यास सुरूवात होणार असल्याने पाणी योजनांच्या कामांना यामुळे ब्रेक लागणार आहे. पावसाळ्यापूर्वी पाणी योजना मार्गी लागाव्यात यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया हे प्रयत्नशिल आहेत. 

आठवडाभरात योजनांच्या कामांत सुधारणा न झाल्यास प्रतिदिन मक्तेदारास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पुढील काळात पाणी योजनांच्या कामास गती न आल्यास दुप्पट दंडाची कारवाई या मक्तेदारांवर करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या