Saturday, May 9, 2026
HomeनगरAhilyanagar : पीजीआय निर्देशांकात नगर राज्यात पाचव्या स्थानावर

Ahilyanagar : पीजीआय निर्देशांकात नगर राज्यात पाचव्या स्थानावर

कोल्हापूर प्रथम || शिक्षणाधिकारी पाटील यांचा सन्मान

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

देशात नावलौकिक असलेले महाराष्ट्राचे शालेय शिक्षण क्षेत्र करोनानंतर पिछाडीवर फेकले गेले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये सलग तिसर्‍या वर्षी महाराष्ट्राची घसरण कायम असल्याचे दिसून आले. एकूण दहापैकी सातव्या श्रेणीवर महाराष्ट्र फेकले गेले आहे. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्याने या पीजीआय निर्देशांकात राज्यात पाचव्या स्थानावर उडी मारली असून ही जिल्ह्याच्या शिक्षण विभागासाठी समाधानाची बाब मानली जात आहे.
देशातील एकंदर सर्वच राज्यातील शालेय शिक्षणाची अवस्था स्पष्ट करणारा अहवाल दरवर्षी केंद्र शासनाकडून जाहीर केला जातो.

- Advertisement -

त्यानुसार, राज्यांचा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (पीजीआय) म्हणजे कामगिरी निर्देशांक कळतो. 2024 सालातील कामगिरीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिक्षणाची गुणवत्ता, शाळांमधील भौतिक सोयीसुविधा, शालेय प्रशासन, पदभरती, विद्यार्थ्यांची गळती, विद्यार्थी-विद्यार्थिनींमधील समानता अशा विविध निकषांवर पडताळणी करून राज्याच्या कामगिरीचा निर्देशांक निश्चित केला जातो. एकंदर एक हजार गुणांपैकी एखादे राज्य किती गुण मिळविते, त्यावर हा निर्देशांक ठरतो. या अहवालात महाराष्ट्राने केवळ 582 गुण मिळवून सातवी श्रेणी (प्रजेष्ट 3 श्रेणी) मिळविली आहे.

त्यामुळे 35 टक्केच्या आसपास गुण मिळवून राज्य एका अर्थाने काठावर पास झाला आहे. मात्र देशात सर्वाधिक गुण मिळविणारे चंदीगढ राज्यही 703 गुणांपर्यंतच पोहोचू शकले. त्यावरुन हा कामगिरी निर्देशांक किती कठोर निकषांवर ठरविला गेला, हे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, राज्यांसोबतच सर्व जिल्ह्यांचाही शैक्षणिक कामगिरीचा निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रात 600 पैकी 345 गुण घेऊन कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. तर परभणी जिल्हा केवळ 276 गुणांसह महाराष्ट्राच्या तळाशी अडकला आहे.

अहिल्यानगर जिल्हा 329 गुण मिळवून राज्यात पाचव्या स्थानावर आहे. यापूर्वी जिल्हा या निर्देशांक गुणांकनात 14 व्या स्थानावर होता. अहिल्यानगरच्या कामगिरीत सुधारणा झाली असून याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव शिक्षण आयुक्त यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचा संभाजीनगर येथे मागील आठवड्यात सन्मान करण्यात आला आहे.

राज्याची सात वर्षांतील कामगिरी
2017-18 श्रेणी तीन, 2018-19 श्रेणी एक, 2019-20 श्रेणी एक, 2020-21 श्रेणी एक, 2021-22 श्रेणी सात, 2022-23 श्रेणी आठ आणि 2023-24 श्रेणी सात.

जिल्हानिहाय मिळालेले गुण (एकूण 600 पैकी)
कोल्हापूर 345, सातारा 341, सोलापूर 340, सांगली 332, अहिल्यानगर 329, मुंबई 327, नागपूर 325, वाशीम 324, पुणे 324, जळगाव 323, नाशिक 322, सिंधुदुर्ग 322, धाराशिव 318, रायगड 315, रत्नागिरी 313, अमरावती 311, वर्धा 309, हिंगोली 308, धुळे 307, चंद्रपूर 306, यवतमाळ 305, ठाणे 304, लातूर 298, बुलडाणा 296, जालना 296, छत्रपती संभाजीनगर 294, नांदेड 293, बीड 292, नंदूरबार 290, गोंदिया 290, अकोला 288, भंडारा 286, पालघर 281, गडचिरोली 280, मुंबई उपनगर 277, परभणी 276 असे आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra weather update : राज्यातील वातावरणात मोठा बदल! अवकाळी पावसाचा इशारा;...

0
मुंबई । Mumbai राज्यातील बदलत्या हवामानाने पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे आता अवकाळी पावसाचा प्रभाव अधिक...