Friday, October 2, 2026
Homeदेश विदेशPeru Plane Crash : भीषण अपघात! पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; १३...

Peru Plane Crash : भीषण अपघात! पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; १३ जणांचा जागीच मृत्यू

दिल्ली । Delhi

वाळवंटात कोरलेल्या शेकडो वर्षांच्या रहस्यमयी आकृत्या आणि अथांग प्राचीन वारसा पाहण्याची उत्सुकता १३ पर्यटकांच्या जीवावर बेतली आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरू (Peru) देशातील जगप्रसिद्ध ‘नाझ्का लाईन्स’ (Nazca Lines) हे पुरातत्व स्थळ पाहायला घेऊन जाणारे एक छोटे विमान शनिवारी कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सर्व १३ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, संपूर्ण क्रीडा व पर्यटन विश्वातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

पेरू प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘एरोडियाना’ (Aerodiana) या खाजगी विमान कंपनीचे हे सेसना ग्रँड कॅराव्हॅन (Cessna Grand Caravan) विमान पर्यटकांना घेऊन पिस्को विमानतळावरून निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमानाचा नियंत्रण कक्षाशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आणि काही वेळातच विमानाचे अवशेष कोरड्या शेतात विखुरलेले आढळले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट निघताना आणि विमानाचे अवशेष पसरलेले दिसत आहेत. तूर्तास अपघाताचे अचूक कारण स्पष्ट झालेले नसले तरी, अपघाताच्या आदल्या दिवशी परिसरात ताशी ४० किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे आणि धूळ यामुळे दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी झाली होती. या धूळ आणि खराब हवामानामुळे जवळच्या मारिया रिचे विमानतळावरील हवाई उड्डाणे आधीच रद्द करण्यात आली होती, तर काही विमाने इतरत्र वळवण्यात आली होती. त्यामुळे या दुर्घटनेमागे खराब हवामान कारणीभूत होते का, या दृष्टीने पेरूच्या हवाई वाहतूक अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.

युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेले ‘नाझ्का लाईन्स’ हे एक अत्यंत लोकप्रिय आणि जगप्रसिद्ध पुरातत्व ठिकाण आहे. या ठिकाणी शेकडो वर्षांपूर्वी वाळवंटातील जमिनीवर विविध प्राण्यांच्या आणि भौमितिक आकृत्यांच्या महाकाय रेषा कोरल्या गेल्या आहेत.

या ऐतिहासिक आकृत्यांचे संपूर्ण दृश्य फक्त विमानाने उंचावरून किंवा मोठ्या मनोऱ्यांवरूनच स्पष्टपणे पाहता येते. यामुळेच दरवर्षी १ लाखांहून अधिक देशी-विदेशी पर्यटक लहान विमानांमधून या भू-चित्रांची हवाई सफर करत असतात. गेल्या १४ वर्षांपासून सुरक्षित सेवेचा दावा करणाऱ्या एरोडियाना कंपनीच्या विमानाला अचानक असा अपघात झाल्याने हवाई सफरींच्या सुरक्षेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासन सध्या पीडितांची ओळख पटवण्याचे आणि अपघाताच्या तपासाचे काम वेगाने करत आहे.

ताज्या बातम्या

भीषण अपघात! अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

0
मुंबई । Mumbai अहिल्यानगर-पाथर्डी या राष्ट्रीय महामार्गावर माळी बाभुळगाव शिवारात गुरुवारी सायंकाळी एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला. एका सुसाट अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत...