Friday, May 3, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये पेट्रोल पंपाच्या वेळेवर बंधन

औरंगाबादमध्ये पेट्रोल पंपाच्या वेळेवर बंधन

औरंगाबाद – aurangabad

कोरोना (corona) लसीकरणाचे प्रमाण वाढण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच पेट्रोल विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद जिल्ह्यात सगळे पेट्रोल पंप (Petrol pump) हे सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंतच सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहूनच पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात असल्याने त्यासाठी लागणारे मनुष्यबळ पाहता पेट्रोल पंप असोसिएशनकडून पंप चालू ठेवण्याच्या वेळांवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल विकण्यास कोरोना लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. ग्राहकांकडून लसीकरण प्रमाणपत्र पाहूनच पेट्रोल, डिझेल द्यायचं आहे. मागील आठवड्यात नियम पाळले नाहीत म्हणून कारवाई करून शहरातील एक आणि जिल्ह्यातील एक असे दोन पेट्रोल पंप सील करण्यात आले होते. त्यामुळे आता पेट्रोल पंप चालकांनी नियम पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने फक्त सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांची गैरसोय होणार

पेट्रोल पंप असोसिएशनच्या या निर्णयानंतर आता मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. कारण कामावरून संध्याकाळी ७ वाजेनंतर सुटणाऱ्या लोकांना पेट्रोल मिळणार नाही. त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी त्यांना मोठे अंतर कापून शासकीय पेट्रोल पंपांवर जावं लागणार आहे. त्यामुळे या निर्णयानंतर आता प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या