मुंबई,नाशिक । प्रतिनिधी Mumbai/ Nashik
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे ( State Government Employees Union ) राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आजपासून दोन दिवसांच्या राज्यव्यापी संपावर गेले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात शुकशुकाट दिसून आला..
काय आहेत या कर्मचाऱ्यांच्या मागण्या वाचा सविस्तर खालील लिंकवर
राज्य सेवक संपावर
नाशिक जिल्ह्यातून ( Nashik District )शासकीय वर्ग 3 व 4 कर्मचारी संपात उतरणार आहेत. संघटनेच्या वतीने प्रत्येक कार्यालयात द्वारसभा घेण्यात आल्या. महसूल विभाग, कोषागार कार्यालय, आदिवासी विकास भवन, धर्मदाय आयुक्त, आर.टी. ओ. कार्यालय, वस्तू व सेवा कर कार्यालय, वन विभाग, शिक्षण संचालनालय, फॉरेन्सिकलॅब, जलसंपदा विभाग, सिव्हील हॉस्पिटल, इ.एस.आय.हॉस्पिटल सातपूर, महसूल आयुक्त कार्यालय नाशिक रोड, आदी सर्व नाशिक जिल्ह्याच्या कार्यालयातील शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 100% टक्के संपात सहभागी झाले असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा सुनंदा जरांडे यांनी सांगितले.