Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनPIFF 2026 : बिस्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल, आशा काळे आणि अमर हलदीपूर...

PIFF 2026 : बिस्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल, आशा काळे आणि अमर हलदीपूर यांना ‘पिफ’चे पुरस्कार जाहीर; मराठी चित्रपट स्पर्धेतील ७ चित्रपटांची घोषणा

पुणे (प्रतिनिधी)

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते बिस्वजित चॅटर्जी, ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार अमर हलदीपूर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ) अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

- Advertisement -

पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ यंदा १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार असून, आज झालेल्या पत्रकार परिषदेत पुरस्कार, मराठी चित्रपट स्पर्धा, मराठी सिनेमा टुडे, कार्यशाळा यांची घोषणा डॉ. पटेल यांनी केली. पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, विश्वस्त सतीश आळेकर, विश्वस्त सबिना संघवी, विश्वस्त किशोरी गद्रे, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) यावेळी उपस्थित होते. २४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन १५ जानेवारीला संध्याकाळी ई-स्क्वेअर थिएटर येथे होणार असून, समारोप व पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदीर येथे होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ यंदा १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील १० स्क्रीनवर होत असून, त्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन http://www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. प्रत्यक्ष थिएटरवर रजिस्ट्रेशन ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी मराठी चित्रपट स्पर्धेची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय ज्यूरींमार्फत करण्यात येते आणि विजेत्या चित्रपटास महाराष्ट्र शासनाचे संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचे ५ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते.

मराठी चित्रपट स्पर्धा

१- आदिशेष – दिग्दर्शक – रमेश मोरे
२- तो, ती आणि फुजी – दिग्दर्शक – मोहित टाकळकर
३- तिघी – दिग्दर्शक – जिजीविशा काळे
४- जीव – दिग्दर्शक – रवींद्र माणिक जाधव
५- गोंधळ – दिग्दर्शक – संतोष डावखर
६- गमन – दिग्दर्शक – मनोज नाईकसाटम
७- बाप्या – दिग्दर्शक – समीर तिवारी

मराठी सिनेमा टुडे

१ – सोहळा – दिग्दर्शक – सैकत बागबान
२ – मुक्कामपोस्ट बोंबीलवाडी – दिग्दर्शक – परेश मोकाशी
३ – माया – दिग्दर्शक – आदित्य इंगळे
४ – द्विधा – दिग्दर्शक – नीलेश भास्कर नाईक

ताज्या बातम्या

ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून, परवान्यासाठी 127 कारखान्यांनी केले अर्ज

0
पुणे | Pune राज्यातील गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मंत्रिसमितीने नुकतीच मान्यता दिली आहे. साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामासाठी आतापर्यंत...