Tuesday, September 29, 2026
HomeनगरAkole : पिंपळगाव निपाणीच्या तरुणाचा अपहरण करुन खून

Akole : पिंपळगाव निपाणीच्या तरुणाचा अपहरण करुन खून

अकोले पोलिसांनी चौघांना केली अटक

अकोले |प्रतिनिधी| Akole

अवैध दारू विक्रेत्याबरोबर झालेल्या वादाचे (Dispute) पर्यावसान एका 37 वर्षीय तरुणाचे अपहरण (Youth Kidnapping) करून त्याची हत्या (Murder) करण्यात झाले. एवढेच नाही तर हत्येनंतर त्या तरुणाचा मृतदेह पिंपळगाव खांड जलाशयात फेकण्याचा (Pimpalgaon Khand Reservoir) धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 7) रात्री चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांत मयताचा भाऊ पोपट किसन वाकचौरे (रा. पिंपळगाव निपाणी) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, त्याचा भाऊ मच्छिंद्र ऊर्फ सचिन किसन वाकचौरे यांचे सचिन सुदाम जाधव (वय 32, ह.रा.नवलेवाडी, अकोले, मूळ रा. पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर) याच्याशी अवैध देशी दारू दुकानात अनेकदा वाद होत होते. याचा राग मनात धरून 26 जुलै रोजी दुपारी 3 ते 3.30 वाजेच्या सुमारास ते 7 ऑगस्ट, 2026 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान धामोडी फाटा येथे सचिन जाधव, दिगंबर रामनाथ रोकडे (वय 35, रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर), संदेश लक्ष्मण उघडे (वय 29, रा. विठे, ठाकरवाडी, ता. अकोले), श्रीकांत राजेंद्र डोंगरे (वय 26, रा. राजापूर रोड, बुळकुंडे मळा, ढोलेवाडी, ता. संगमनेर) यांनी मच्छिंद्र ऊर्फ सचिन किसन वाकचौरे यास मारहाण (Beating) करून त्यास गाडीमध्ये घालून नेत खून केला व त्याचे कपडे काढून नग्नावस्थेत सुती दोराने बांधून पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून दिले असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

यावरुन अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 1 ते 3 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत (दि.12) पोलीस कोठडी सुनावली आहे तर चौथा आरोपी श्रीकांत डोंगरे यास शनिवारी दुपारी अटक (Arrested) करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करत आहे. दरम्यान, मृतदेह जलाशयात पोलिसांनी ड्रोनच्या साहाय्याने शोध घेतल्यानंतर आढळून आला. या घटनेतील मुख्य आरोपी सचिन जाधव हा अवैध दारू विके्रता असून त्याच्यावर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.

ताज्या बातम्या

Ghoti Crime News : गोंदे MIDC गोळीबार प्रकरणाचा एलसीबीकडून छडा; एक...

0
घोटी | वार्ताहर | Ghoti वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Wadhivhare Police Station Area) गोंदे एमआयडीसी परिसरात घडलेल्या खळबळजनक गोळीबार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)...