Friday, May 3, 2024
Homeधुळेसातरणेत तरुणाकडून गावठी कट्टा जप्त

सातरणेत तरुणाकडून गावठी कट्टा जप्त

धुळे – प्रतिनिधी – dhule

दहशत निर्माण करण्यासाठी गावठी कट्टा बाळगणार्‍या तरुणाला एलसीबीच्या (lcb) पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्टा आणि दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याने हा गावठी कट्टा त्याच्या मित्राकडुन खरेदी केल्याची कबुली दिली आहे.

- Advertisement -

धुळे तालुक्यातील सातरणे (सातरणे) गावातील गोपाल बाळु पाटील नावाचा इसम दहशत माजविण्यासाठी गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. आज सकाळी एलसीबीचे पथकाने सातरणे (ता.धुळे) गावात छापा टाकत गोपाल पाटील याला त्याच्या घराबाहेरून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या घराच्या हॉलमधील लाकडी कॉटवरील गादीच्या खाली लपविलेली पिस्टल काढून दिले. त्यात दोन काडतुसे होती.

पोलिसांनी गावठी कट्टा व काडतूस असा एकूण २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.त्याने ही पिस्टल वडगाव (ता.धुळे) येथील त्याचा मित्र महेश याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी तालुका पोलिसात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील,अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, पोहेकॉ.प्रकाश सोनार, संदीप सरग, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवी किरण राठोड,विशाल पाटील,महेश मराठे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या