Friday, May 3, 2024
Homeनाशिकबारावी बोर्ड परीक्षेसाठी नियोजन

बारावी बोर्ड परीक्षेसाठी नियोजन

सटाणा । Satana (ता. प्र.)

येथील महाविद्यालयात 12 वी बोर्ड परीक्षेसाठी दि.20 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबर या कालावधीत नियोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी दिली.

- Advertisement -

येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना.म.सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण 109 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.

शाखानिहाय कला शाखेत 71 विद्यार्थी, वाणिज्य शाखेत 14, विज्ञान शाखेचे 12 तसेच एच. एस. सी. व्होकेशनल विभागाचे 12 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होणार आहेत.

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे संसर्ग होऊ नये म्हणून परीक्षार्थीनी आपला मास्क, सॅनिटायझर बॉटल, स्वतःची पाण्याची बॉटल, परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य सोबत आणावे. प्रत्येक परीक्षा खोलीत सामाजिक अंतर राखून केवळ 13 विद्यार्थीच बसविण्यात येणार आहेत.

खोल्यांचे पूर्णतः निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनींग करुनच प्रवेश देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य सांभाळून प्रसन्न वातावरणात परीक्षा द्यावी व उज्ज्वल यश संपादन करावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे व केंद्रसंचालक प्रा. सुनील बागुल यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या