Wednesday, June 24, 2026
HomeनगरRahata : किसान सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता खात्यात जमा

Rahata : किसान सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता खात्यात जमा

जिल्ह्यातील 5.66 लाख शेतकर्‍यांना 111 कोटींचे अनुदान- ना. विखे पाटील

राहाता |प्रतिनिधी| Rahata

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता जिल्ह्यातील 5 लाख 66 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे 111 कोटी 37 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकर्‍यांना आर्थिक मदत म्हणून किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेच्या 23 व्या हप्त्याचे अनुदान नुकतेच जिल्ह्यातील 5 लाख 66 हजार 806 शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले आहे. जिल्ह्यातील तालुकावार मिळालेले अनुदान खालीलप्रमाणे आहे.

अकोले: 35 हजार 90 शेतकर्‍यांना 7 कोटी 1 लाख 80 हजार रुपये, जामखेड : 30 हजार 914 शेतकर्‍यांना 6 कोटी 18 लाख 28 हजार रुपये, कर्जत : 44 हजार 95 शेतकर्‍यांना 8 कोटी 81 लाख 90 हजार रुपये, कोपरगाव : 28 हजार 369 शेतकर्‍यांना 5 कोटी 72 लाख 78 हजार रुपये, अहिल्यानगर : 31 हजार 353 शेतकर्‍यांना 6 कोटी 27 लाख 6 हजार रुपये, नेवासा : 54 हजार 598 शेतकर्‍यांना 10 कोटी 91 लाख 6 हजार रुपये, पारनेर : 51 हजार 136 शेतकर्‍यांना 10 कोटी 22 लाख 72 हजार रुपये, पाथर्डी : 40 हजार 970 शेतकर्‍यांना 8 कोटी 19 लाख 40 हजार रुपये, राहाता : 24 हजार 711 शेतकर्‍यांना 4 कोटी 94 लाख 22 हजार रुपये, राहुरी : 38 हजार 361 शेतकर्‍यांना 7 कोटी 72 लाख 62 हजार रुपये, संगमनेर : 59 हजार 403 शेतकर्‍यांना 11 कोटी 88 लाख 6 हजार रुपये, शेवगाव : 43 हजार 798 शेतकर्‍यांना 8 कोटी 75 लाख 96 हजार रुपये, श्रीगोंदा : 50 हजार 901 शेतकर्‍यांना 10 कोटी 18 लाख 2 हजार रुपये, श्रीरामपूर : 22 हजार 612 शेतकर्‍यांना 4 कोटी 52 लाख 4 हजार रुपयांचे रूपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेमध्ये सातत्य ठेवले आहे. तसेच राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शेतकर्‍यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी सरकारने सुरू केली असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राष्ट्रपती पोलीस पदकप्राप्त एलसीबीचा पीएसआय वाघ निलंबित

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत नेवासा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका गाजलेल्या कारवाईप्रकरणी हप्त्याची मागणी केल्याच्या गंभीर आरोपांच्या चौकशीनंतर स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी)...