Wednesday, June 10, 2026
Homeदेश विदेशPM Narendra Modi: मोदी सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे दुसरे नेते ठरले,...

PM Narendra Modi: मोदी सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे दुसरे नेते ठरले, इंदिरा गांधींचा विक्रम मोडला; पहिल्या क्रमांकावर कोण?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे दुसरे नेते ठरले आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा रेकॉर्ड त्यांनी स्वत:च्या नावे केला आहे. ते भारताचे दुसरे सर्वात जास्त काळ सेवा देणारे पंतप्रधान ठरले आहेत. मोदी यांनी आज (शुक्रवार, २५ जुलै २०२५) भारताचे पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले आहेत. सलग हे पद भूषवण्याच्या बाबतीत त्यांनी इंदिरा गांधींना मागे टाकले आहे. तसेच मोदी यांनी राज्य व केंद्रातील कारभार मिळून २४ वर्षांहून अधिक काळ सरकारचे नेतृत्व केले आहे. हा देखील सर्व पंतप्रधानांमधील मोठा विक्रम आहे.

इंदिरा गांधी यांनी १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४ या काळातही पंतप्रधान म्हणून काम केले होते. तर मोदी सन २६ मे २०१४ पासून या पदावर आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मोदी हे भारतातील एकमेव नेते आहेत, ज्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत २००२, २००७ आणि २०१२ मध्ये आणि राष्ट्रीय निवडणुकांमध्ये २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सर्वाधिक काळ म्हणजेच, १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ पर्यंत १६ वर्षे आणि २८६ दिवस पंतप्रधानपद भूषवले होते. सध्या ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे, ज्यामुळे भारतीय राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

भाजपच्या वतीने एक्सवर यासंबंधी पोस्ट करण्यात आली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विक्रम केला आहे. आज २५ जुलै २०२५ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग ४,०७८ दिवसांच्या कार्यकाळात पूर्ण करतील, अधिकृतपणे भारताच्या इतिहासातील दुसरे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले पंतप्रधान बनतील, इंदिरा गांधी (१९६६ ते १९७७ पर्यंत ४,०७७ दिवस) यांना मागे टाकले.”

आता नेहरूंशी स्पर्धा
सलग सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवण्याच्या बाबतीत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आघाडीवर आहेत. त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ पर्यंत सलग ६,१२६ दिवस (१६ वर्षे २८६ दिवस) भारताचे नेतृत्त्व केले आहे. मोदी यांना नेहरुंचा हा विक्रम मोडण्यासाठी आणखी २०४८ दिवस भारताचे नेतृत्त्व करावे लागले. त्यासाठी त्यांना व भाजपाला पुढची म्हणजेच २०२९ ची लोकसभा निवडणूक देखील जिंकावी लागेल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नरेंद्र

PM Narendra Modi: जनसेवा हीच सुशासनाची मोठी कसोटी…; पंतप्रधान नरेंद्र मोदींची...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारचा १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या...