Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ग्रीसमध्ये पंतप्रधान 'या' विशेष...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ग्रीसमध्ये पंतप्रधान ‘या’ विशेष पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ग्रीस दौऱ्यावर (PM Narendra Modi On Greece) आहेत. ग्रीसमध्ये पोहोचताच पंतप्रधानांचे अथेन्स शहरात (Athense) जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षा कॅटरिना एन. सकेलारोपोलू (President Katerina Sakellaropoulou) यांनी ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर’ (The Grand Cross of the Order of Honour) या देशातील दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने शुक्रवारी सन्मानित केले.

- Advertisement -

ग्रीसमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षा सकेलारोपोलू यांची भेट झाली. यावेळी ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींचे चांद्रयानाच्या यशस्वीतेबद्दल अभिनंदन केले. हे यश केवळ भारताचे यश नाही तर संपूर्ण मानवजातीचे यश आहे.

Neeraj Chopra : नीरज चोप्राचा डबल धमाका, वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलसह पटकावलं ऑलिम्पिकचं तिकिट

चांद्रयान-३ मिशनद्वारे एकत्र करण्यात आलेला डेटा संपूर्ण वैज्ञानिक कम्युनिटी आणि मानवजातीची मदत करतील.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या ऑर्डर ऑफ ऑनर या सन्मानाची स्थापना १९७५ मध्ये झाली होती. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ग्रीसच्या पंतप्रधान आणि मान्यवरांना प्रदान केला जातो ज्यांनी त्यांच्या विशेष स्थानामुळे ग्रीसच्या प्रगतीमध्ये योगदान दिले आहे.

या सन्मानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या मानपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने भारतातील मैत्रीपुर्ण लोकांचा सन्मान करण्यात येत आहे असा उल्लेख करण्यात आला आहे.

४० वर्षांनंतर भेट देणारे पहिले पंतप्रधान

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४० वर्षात पहिल्यांदा ग्रीसच्या दौऱ्यावर जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सप्टेंबर १९८३ मध्ये ग्रीसचा दौरा केला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या