Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान मोदींनी लिहीले गीत; ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिकेसोबत केले लेखन

पंतप्रधान मोदींनी लिहीले गीत; ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिकेसोबत केले लेखन

मुंबई | Mumbai

भरडधान्यांचे फायदे आणि जगभरातील उपासमार कमी करण्याची त्यांची क्षमता मांडण्यासाठी ग्रॅमी पुरस्कार विजेत्या (Grammy Award Winner Singer Falguni Shah) गायिका आणि गीतकार फालू यांच्या बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गीतलेखन केले आहे.

- Advertisement -

‘अबंडन्स इन मिलेट्स’ (Abundance In Millets )हे गाणे मुंबईत जन्मलेल्या गायिका-गीतकार फाल्गुनी शाह आणि तिचा पती आणि गायक गौरव शाह यांनी गायले आहे. हे गाणे 16 जून रोजी रिलीज झाले असून भारताच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र महासभेने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. हे गीत विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले जाणार असून ते प्रादेशिक भाषांमध्ये आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

हे गाणे रिलीज होण्यापूर्वी फालूने मीडियाला सांगितले की, हे गाणे मी आणि माझे पती गौरव शाह यांनी लिहीले असून इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहिलेले हे गाणे सर्वांना उपलब्ध करून देण्यात येणार असून भरडधान्यांचे फायदे अधोरेखित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी दिल्लीत मोदी यांची भेट घेतली, तेव्हा भरडधान्यावर गीत लिहिण्याची कल्पना सुचली. जगातील भूक कमी करण्यासाठी या अत्यंत पौष्टिक धान्याच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘अबंडन्स ऑफ मिलेट्स’ हे गाणे तयार करण्यात आले आहे.

दरम्यान, फालूला २०२२ मध्ये ‘अ कलरफुल वर्ल्ड’साठी सर्वोत्कृष्ट मुलांच्या अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फालू म्हणाले की, ग्रॅमी जिंकल्यानंतर गेल्या वर्षी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीदरम्यान भरडधान्यावर गाणे लिहिण्याची कल्पना मला सुचल्याचे फालूने सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या