Thursday, May 14, 2026
Homeदेश विदेशरशिया-युक्रेन युध्दावर पहिल्यांदाच पुतीन मोकळेपणाने बोलले; भारताच्या भुमिकेवरही केली टिप्पणी, म्हणाले, युक्रेन...

रशिया-युक्रेन युध्दावर पहिल्यांदाच पुतीन मोकळेपणाने बोलले; भारताच्या भुमिकेवरही केली टिप्पणी, म्हणाले, युक्रेन प्रकरणावर भारताने…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज(दि.5) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वपूर्ण करार झाले. यादरम्यान, पुतिन यांनी पहिल्यांदाच रशिया-युक्रेन युद्धावर स्पष्टपणे भाष्य केले. यावेळी दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धावर पंतप्रधान मोदींनीही भारताची भूमिका मांडली. “भारत या युद्धात तटस्थ नाही. तर आम्ही शांततेच्या बाजूने आहोत”, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. मी अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा करत असताना आमची ही भूमिका वेळोवेळी मांडत आलो आहे, असेही ते म्हणाले.

भारताच्या भुमिकेला खऱ्या अर्थाने महत्व देतो
रशिया आता अमेरिकेसह अनेक देशांसोबत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांततामय पर्यायांवर विचार करत असल्याची प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली. दोन्ही नेत्यांत झालेल्या बैठकीदरम्यान पुतिन म्हणाले की, युक्रेन प्रकरणावर भारताने नेहमीच गंभीर, संतुलित आणि जबाबदार भूमिका घेतली आहे. आम्ही भारताच्या या भूमिकेला खऱ्या अर्थाने महत्व देतो आणि याला शांती प्रक्रियेतील सकारात्मक योगदान मानतो.

- Advertisement -

आम्ही शांततेच्या हरऐक प्रयत्नांना पाठिंबा देऊ
यावेळी मोदी म्हणाले, “जगाने आता शांततेच्या मार्गावर परतले पाहिजे. आम्ही शांततेच्या हरऐक प्रयत्नांना पाठिंबा देऊ. युक्रेन संघर्षात भारत तटस्थ नाही. भारत शांततेच्या बाजूने आहे. भारत-रशिया संबंध अधिक दृढ होऊन त्याने नवी उंची गाठायला हवी.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पद स्वीकारल्यापासून गेल्या ११ वर्षात त्यांची पुतिन यांच्याबरोबर १९ वेळा भेट झाली आहे. भारत आणि रशिया यांच्यात फार पूर्वीपासून अनेक आघाड्यांवर सौहार्दपूर्ण संबंध राहिले होते. पंतप्रधान मोदींनी भारताचे हे परराष्ट्र धोरण कायम राखले.

पुतिन यांनी भारत-रशिया संबंधांबाबत म्हणाले की, हे नाते फक्त ऐतिहासिक नाही तर, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे गेल्या काही वर्षांत अधिक मजबूत आणि आधुनिक झाले आहे. आता दोन्ही देशांनी उच्च-तंत्रज्ञान, अवकाश क्षेत्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नव्या पिढीच्या तंत्रज्ञानांमध्ये सहकार्य वाढवले आहे. ही भागीदारी केवळ कूटनीती नाही, तर खऱ्या प्रगतीचे प्रतीक आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...