Monday, May 4, 2026
Homeदेश विदेशPM Modi Rakshabandhan: "मी मोदी काकांसाठी मोराची राखी आणली…", पंतप्रधानांनी लहान मुलींसोबत...

PM Modi Rakshabandhan: “मी मोदी काकांसाठी मोराची राखी आणली…”, पंतप्रधानांनी लहान मुलींसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शनिवारी देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाऊ आणि बहिणीच्या नात्याला समर्पित या सणानिमित्त, पंतप्रधानांच्या ७, लोक कल्याण मार्ग, दिल्ली येथील निवासस्थानी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता, जिथे विविध शाळांमधील विद्यार्थिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दिल्लीतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींच्या मनगटावर राखी बांधली आणि त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाचा एक व्हिडीओ पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओमध्ये चिमुकल्यांसोबत पंतप्रधान मोदी संवाद साधताना दिसत आहेत. त्यांनी सर्व विद्यार्थिनींना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्व विद्यार्थिनींचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला. त्यात एक मुलगी देखील होती जिने पंतप्रधानांना सांगितले की मी मोदी काकांसाठी मोराची राखी आणली आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले की, “सर्व देशवासियांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

एक चिमुकली मला पंतप्रधान व्हायचे आहे, असे पंतप्रधान मोदींना सांगताना दिसत आहे. ‘स्वच्छ भारत’, ‘मन की बात’, ‘उज्ज्वला गॅस’, ‘अटल पेन्शन’, ‘डिजीटल इंडिया’, अशा केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख यावेळी दोन विद्यार्थिंनीनी पंतप्रधान मोदींसमोर केला. या सर्व योजना विद्यार्थीनींनी लक्षात ठेवल्याने पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.

सैन्य प्रमुखांना बांधली राखी
रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर, लहान मुलींनी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना राख्या बांधल्या. देशाच्या संरक्षणाचे प्रतीक असलेल्या लष्करप्रमुखांच्या हाताला या पवित्र राख्यांनी सजवण्यात आले होते. ही राखी भारतीय सैन्य देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तयार असल्याचे आणि नागरिकांचा सैन्यावर पूर्ण विश्वास असल्याचे प्रतीक आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...