नाशिक | प्रतिनिधी
नाशिकच्या ओझर विमानतळावरून विमानसेवेचे २५ ऑक्टोबरपासून नवे प्रस्तावित वेळापत्रक लागू होणार आहे. हे वेळापत्रक २७ मार्च २०२७ पर्यंत वैध राहणार आहे.
प्रस्तावित वेळापत्रकानुसार, दिल्लीहून येणारे विमान सकाळी ८.३५ वाजता नाशिकमध्ये पोहोचेल, तर दिल्लीसाठी सकाळी ९.०५ वाजता उड्डाण करेल. बंगळुरूहून दुपारी ३.५० वाजता विमान नाशिकमध्ये येईल आणि सायंकाळी ४.२० वाजता बंगळुरूसाठी रवाना होईल. हैदराबादहून सायंकाळी ४.४० वाजता विमान नाशिकमध्ये पोहोचणार असून, सायंकाळी ५.१० वाजता हैदराबादसाठी उड्डाण नियोजित आहे. अहमदाबादहून येणारे विमान सायंकाळी ५.२० वाजता नाशिकमध्ये पोहोचेल, तर ५.४० वाजता अहमदाबादसाठी रवाना होईल. दिल्ली मार्गावरील रात्रीची सेवाही सुरू राहणार आहे. दिल्लीहून रात्री ९.२० वाजता विमान नाशिकमध्ये पोहोचेल आणि रात्री ९.५५ वाजता दिल्लीसाठी उड्डाण करेल.
मार्ग नाशिकमध्ये आगमन नाशिकहून प्रस्थान
दिल्ली सकाळी ८.३५ सकाळी ९.०५
बंगळुरु दुपारी ३.५० सायंकाळी ४.२०
हैदराबाद सायंकाळी ४.४० सायंकाळी ५.१०
अहमदाबाद सायंकाळी ५.२० सायंकाळी ५.४०
दिल्ली (रात्री) रात्री ९.२० रात्री ९.५५




