नवी दिल्ली | New Delhi
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Vidhansabha Election) येत्या बुधवारी (दि.५ फेब्रुवारी) रोजी मतदान (Voting) होणार आहे. त्याआधी येथील प्रचार सभांनी राजकारण चांगलेच तापले आहे. दिल्लीत यंदा आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील आरके पुरम या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंडीत नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या सरकारच्या कर धोरणावर जोरदार टीका केली.
यावेळी बोलतांना मोदी म्हणाले की,”सामान्य माणसांना केंद्र सरकारने १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केले. जर तुम्ही आज नेहरुंच्या काळात असतात तर १२ लाख रुपयांच्या एक चतुर्थांश भाग म्हणजेच जवळपास ३ लाख रुपये कर घेतला असता.” अशी टीका केली. तसेच १० वर्षांत आपण भारताची अर्थव्यवस्था (Economy) १० व्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आणली आहे”, असेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की,”दिल्लीत यावेळी भाजपाचे (BJP) सरकार येणार आहे. दिल्लीची ‘आपदा’ म्हणजेच आप सरकारने दिल्लीच्या नागरिकांची ११ वर्षे वाया घालवली. दिल्लीकरांना माझे आवाहन आहे की त्यांनी यावेळी भाजपाला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी. मी तुम्हाला गॅरंटी देतो की प्रत्येक नागरिकाची अडचण दूर करण्यासाठी मी मेहनत घेईन. आपल्याला असं सरकार आणायचे आहे जे सरकार (Government) दिल्लीची सेवा करेल. आपल्याला आता आपदा सरकार नको” असे म्हणत मोदींनी आप सरकारवर (AAP Government) जोरदार टीका केली.
तसेच “मतदानाच्या (Voting) आधीच झाडूच्या काड्या काड्या विखरुन गेल्या आहेत. आपदाचे नेतेही त्यांची साथ सोडत आहेत. कारण आता दिल्लीकरांनाच नाही तर आपमधल्या लोकांनाही समजले आहे की आपवर दिल्ली नाराज आहे. दिल्लीकरांच्या मनात जो राग आहे त्यामुळे आपदा पक्षाचे लोक घाबरले गेले आहेत. ते रोज काहीतरी खोट्या घोषणा करत आहेत. पण आता आपचा मुखवटा उतरला असून ते १० वर्षांपासून खोटे बोलून मते मागत आहेत”, अशी टीकाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.