Tuesday, November 19, 2024
Homeमुख्य बातम्यालोकसभेनंतर राज्यसभेतही पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, "अजून २० वर्षे..."

लोकसभेनंतर राज्यसभेतही पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “अजून २० वर्षे…”

नवी दिल्ली | New Delhi

नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्ममधील एनडीए सरकारचा (NDA Government) संसदेत सुरु असलेल्या पहिल्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.या अधिवेशनात पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावर काल लोकसभेत (Loksabha) उत्तर दिल्यानंतर आज राज्यसभेतही (Rajyasabha) उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत ‘संविधान आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे. देशातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, असे म्हणत निशाणा साधला. तर दुसरीकडे मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग केला.त्यामुळे या सर्व प्रकारावरून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी व्यतित होऊन विरोधकांनी मला पाठ दाखवली नसून संविधानाला पाठ दाखवली आहे, असे म्हटले.मात्र, मोदींनी आज आपल्या राज्यसभेतील भाषणात पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ; मात्र, तरीही पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राष्ट्रपतींचे भाषण देशासाठी प्रेरणा देणारे होते. देशातील जनतेने तिसऱ्यांदा आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. काहींनी देशातील जनतेच्या विवेक बुद्धीवर प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आकडे आल्यापासून झेंडे घेऊन पळत होते. भ्रम पसरवणाऱ्यांचे राजकारण देशवासीयांनी नाकारले असून विरोधकांना ही एक मोठी चपराक आहे. आमचे सरकार येऊन दहा वर्षे झाली असून अजून २० वर्षे बाकी आहेत, असे नरेंद्र मोदींनी म्हटले.

हे देखील वाचा : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ५० हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, “सार्वजनिक जीवनात माझ्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांच्या कुटुंबातून सरपंचही झाले नाहीत आणि राजकारणाशीही संबंध नाही. पण आज ते महत्त्वाच्या पदावर पोहोचले आहेत. याचे कारण बाबासाहेबांनी दिलेले संविधान आहे. आमच्यासारखे लोक इथपर्यंत पोहोचण्याचे कारण म्हणजे संविधान आणि जनतेची मान्यता. आपल्यासाठी संविधान हा केवळ लेखांचा संग्रह नाही, तर त्याचा आत्माही खूप महत्त्वाचा आहे.कोणत्याही परिस्थितीत संविधान आपल्याला मार्गदर्शन करण्याचे काम करते,असेही मोदी यांनी सांगितले.

हे देखील वाचा : शेअर मार्केटमध्ये कोटींची गुंतवणूक, एकही कार नाही; पंकजा मुंडेंची संपत्ती नेमकी किती?

तसेच आज आपण ७५ व्या वर्षात पदार्पण करत असताना जनउत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील जनतेने आपल्याला तिसऱ्यांदा संधी दिली आहे, ती संधी विकसित भारताची, स्वावलंबी भारताची ही वाटचाल स्वीकारून हा संकल्प पुढे नेण्याचा आशीर्वाद दिला आहे. ही निवडणूक केवळ गेल्या १० वर्षांच्या कामगिरीवर मंजुरीचा शिक्का नाही तर भविष्यातील धोरणांवरही मान्यता देणारा शिक्का आहे. देशातील जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याने आम्हाला संधी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : अनाठायी धाडस जीवघेणे!

गेल्या १० वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेला १० व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेण्यात यश आले आहे आणि जसजशी संख्या जवळ येत आहे तसतशी आव्हानेही वाढत आहेत. कोरोनाचा कठीण काळ आणि जागतिक संघर्षाची परिस्थिती असतानाही आम्ही सक्षम आहोत. आपल्या अर्थव्यवस्थेला १० व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेण्यात यश आले आहे.यावेळी देशातील जनतेने भारताला पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर नेण्याचा जनादेश दिला आहे आणि मला विश्वास आहे की, जनतेने दिलेल्या जनादेशामुळे आपण भारताला पहिल्या तीन क्रमांकावर नेऊ,असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या