Friday, September 4, 2026
Homeदेश विदेशPM Narendra Modi: इंधन कपातीच्या आवाहनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; ताफ्यातील...

PM Narendra Modi: इंधन कपातीच्या आवाहनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; ताफ्यातील गाड्यांची संख्या केली कमी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच वाढती जागतिक अनिश्चितता, इंधन संकट आणि परकीय चलन साठ्यावर वाढणारा ताण लक्षात घेता देशातील नागरिकांना इंधन बचतीचा संदेश दिला होता. आता याच पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्मी केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ (SPG)ला आदेश दिले आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने या आदेशाची अंमलबजावणी सुरु केली आहे. मात्र, ‘ब्लू बुक’मध्ये नमूद केलेल्या सुरक्षा मानकांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधानांकडून ताफ्यात ५०% कपात
पंतप्रधानांनी आपल्या ताफ्यात ५० टक्के कपात केली आहे. वडोदरा आणि आसाममध्ये शपथविधीसाठी गेलेल्या गुवाहाटी दौऱ्यात पंतप्रधानांच्या ताफ्यात ही कपात दिसून आली. ताफ्यात इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवावा, मात्र त्यासाठी नवीन खरेदी करू नये, असे निर्देश एसपीजीला देण्यात आले आहेत.

Nida Khan : निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाचे घर जमीनदोस्त; संभाजीनगरात पहाटेच चालला बुलडोझर!

भाजपशासित राज्यांमध्ये निर्णयाचा प्रभाव
पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयाचा प्रभाव आता भाजपशासित राज्यांमध्येही दिसायला लागला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रे रेखा गुप्ता, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही अधिकृत ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय वर्तुळात या निर्णयाकडे प्रशासनातील खर्चावर नियंत्रण आणि इंधन बचतीसाठी घेतलेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

पंतप्रधान मोदींनी काय आवाहन केले
हैदराबादमध्ये जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, “मी देशातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की, त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करावा. मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करा. ज्यांच्याकडे कार आहे, त्यांनी एकाच गाडीतून जास्तीत जास्त लोकांना सोबत नेले पाहिजे.”

प्रत्येक गोष्टीसाठी आयातीवर अवलंबून राहून देश प्रगती करू शकत नाही, असे सांगत त्यांनी स्थानिक उत्पादनांच्या वापरावर भर दिला. तसेच, नागरिकांना पुढील एक वर्ष अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहनदेखील केले. परकीय चलन साठ्यावर ताण कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी म्हटले. तसेच परदेश दौरे, डेस्टिनेशन वेडिंग आणि अनावश्यक विदेशी पर्यटन टाळण्याचाही सल्ला त्यांनी दिला. देशांतर्गत पर्यटन आणि भारतातच समारंभ आयोजित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...