Thursday, May 14, 2026
Homeदेश विदेशShubhanshu Shukla: भारताचे भव्य, तेजस्वी दर्शन होते, दररोज १६ सुर्योदय, १६ सुर्यास्त...

Shubhanshu Shukla: भारताचे भव्य, तेजस्वी दर्शन होते, दररोज १६ सुर्योदय, १६ सुर्यास्त पाहतो; अंतराळवीर शुभांशूने मोदींची साधला संवाद

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळात गेलेल्या शुभांशू शुक्ला यांच्याशी काल (शनिवारी) खास संवाद साधला. याबाबतची माहिती PMO ने दिली. या संभाषणादरम्यान, पंतप्रधान मोदींनी शुभांशू शुक्ला यांचे केवळ कौतुकच केले नाही, तर त्यांनी याला गगनयान मोहिमेचा पहिला अध्याय देखील म्हटले आहे. तुमची अंतराळयात्रा नवयुगाची सुरवात आहे असेही सांगितले. शुभांशू यांनी अंतराळ प्रवास हा देशाचा प्रवास असल्याचे वर्णन केले आणि भारताची स्वप्ने साकार करण्याची ही संधी असल्याचे सांगितले.

सुमारे १८ मिनिटांच्या संभाषणात पंतप्रधान मोदी आणि शुभांशू शुक्ला यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी शुभांशू शुक्ला यांना विचारले की, परिक्रमा ही भारताची शतकानुशतके जुनी परंपरा आहे. तुम्हाला पृथ्वी मातेची प्रदक्षिणा करण्याचे भाग्य मिळाले आहे, तुम्ही सध्या पृथ्वीच्या कोणत्या भागातून जाणार आहात?

- Advertisement -

यावर शुभांशू यांनी सांगितले की काही वेळापूर्वी आम्ही अमेरिकेच्या हवाई हद्दीवरुन जात होतो. त्यांनी असेही सांगितले की ते दिवसातून १६ वेळा पृथ्वीभोवती फिरता. त्यामुळे आम्ही १६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्त पाहतो. शुभांशू यांनी सांगितले की – या कक्षेत, इतक्या जलद गतीने फिरतो की, आपण सध्या सुमारे २८ हजार किमी/तास वेगाने पुढे जात आहोत.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय अंतराळवीर असा बहुमान शुभांशू शुक्ला यांनी मिळविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सध्या आपण दोघेच बोलतो आहोत, पण १४० कोटी भारतीय तुमच्यासोबत आहेत. तुम्ही भारताचा तिरंगा अंतराळात फडकवला आहे. यासाठी मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. तुमचा हा अंतराळ प्रवास ‘विकसित भारता’साठी महत्त्वाचा क्षण असल्याचेही ते म्हणाले. त्यावर शुभांशू म्हणाले की, अंतराळ प्रवास हा माझा वैयक्तिक पराक्रम नसून ही संपूर्ण देशासाठी महत्त्वाची घटना आहे.

शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, हा एक अतिशय नवीन अनुभव आहे. अशा गोष्टी घडत आहेत, ज्यावरून आपला भारत कोणत्या दिशेने जात आहे हे दिसून येते. पंतप्रधानांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि अंतराळाशी संबंधित भारताच्या भविष्यातील संकल्पांमध्ये भागीदार होण्याचे आवाहन केले. शनिवारी, अंतराळ स्थानकावरून उपग्रहाद्वारे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आरोग्याबद्दल विचारले.

गाजर हलवा मित्रांना खाऊ घातला का?
तुम्ही अंतराळ सफरीवर गाजराचा हलवा घेऊन गेला आहात. तो तुम्ही मित्रांना खाऊ घातला का? या पंतप्रधान मोदी यांनी विचारलेल्या हलक्याफुलक्या प्रश्नावर शुभांशू शुक्ला म्हणाले की, मी गाजराचा हलवा तसेच मूग डाळीचा हलवा आणि आंब्याचा रसदेखील माझ्यासोबत येथे आणलेला होता. हे पदार्थ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आम्ही एकत्र बसून खाल्ले. सर्वांना ते फार आवडले, अशी माहितीही शुभांशू यांनी यावेळी दिली.

दररोज १६ सुर्योदय,१६ सुर्यास्त पाहतो
पंतप्रधान पुढे म्हणाले की, शुभांशू यांच्या चांद्रयानाच्या यशानंतर देशातील मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये विज्ञानाची एक नवीन आवड निर्माण झाली असून, अंतराळाची आवड वाढली आहे. आता तुमचा हा ऐतिहासिक प्रवास त्या संकल्पाला आणखी बळकटी देत आहे. आज मुले फक्त आकाशाकडे पाहत नाहीत, त्यांना वाटते की मीही तिथे पोहोचू शकतो. ही विचारसरणी, ही भावना आपल्या भविष्यातील अंतराळ मोहिमांचा खरा पाया आहे. अंतराळातून भारताचे भव्य, तेजस्वी दर्शन होते तसेच आम्ही दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो असे शुक्लांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी ‘भारतमाता की जय’ घोषणाही दिली.

हा प्रवास केवळ माझा नाही तर देशाचा प्रवास
शुभांशू हे पाहून भारावून गेले. ते म्हणाले – पृथ्वीपासून कक्षापर्यंतचा ४०० किलोमीटरचा छोटासा प्रवास हा केवळ माझा प्रवास नाही तर माझ्या देशाचा प्रवास आहे. मी लहान असताना, मी कधीच कल्पनाही केली नव्हती की मी अंतराळवीर होऊ शकेन, परंतु मला वाटते की तुमच्या नेतृत्वाखालील आजचा भारत आपल्याला ही संधी देतो आणि ती स्वप्ने सत्यात उतरवण्याची संधी देखील देतो. ही माझ्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे आणि मला येथे माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली याचा मला खूप अभिमान आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...