Tuesday, December 3, 2024
Homeदेश विदेशजे फाळणीच्या भयावहतेने प्रभावित झाले आणि…; पंतप्रधान मोदींनी फाळणीतील पीडितांना वाहिली श्रध्दांजली

जे फाळणीच्या भयावहतेने प्रभावित झाले आणि…; पंतप्रधान मोदींनी फाळणीतील पीडितांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (14 ऑगस्ट) भारताच्या फाळणीदरम्यान अमानुष दुःख्ख आणि वेदना सोसणाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, आजचा दिवस अशा लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे, ज्यांनी फाळणीचे चटके सोसून पुन्हा आपल्या जीवनाला नव्याने प्रारंभ केला. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीने १९४७ मध्ये आजच्याच दिवशी भारताची फाळणी केली होती. यानंतर पाकिस्तानच्या रुपाने नव्या देशाचा जन्म झाला, अशी पोस्ट त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “फाळणीच्या स्मृती दिनानिमित्त, आपण त्या लोकांचे स्मरण करत आहोत, जे फाळणीच्या भयावहतेने प्रभावित झाले आणि प्रचंड त्रास सहन केला. त्यांच्या धैर्याला श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे, ज्यांनी मानवाची सावरण्याची शक्ती दर्शवली. फाळणीमुळे प्रभावित झालेल्या अनेकांनी आपल्या जीवनाची नव्याने सुरूवात केली आणि मोठे यशही मिळवले. आज आम्ही आपल्या देशातील एकता आणि बंधुतेचे सदैव रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचाही पुनरुच्चार करतो.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या