Sunday, June 14, 2026
HomeनगरCrime News : सेवानिवृत्त व्यक्तीची पाच लाखांची फसवणूक

Crime News : सेवानिवृत्त व्यक्तीची पाच लाखांची फसवणूक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आळंदी (जि. पुणे) येथे प्लॉट देण्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर शहरातील एका सेवानिवृत्त व्यक्तीला पाच लाख 5 हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेले अर्जुन ग्यानुजी कांबळे (वय 67, रा. यशोदानगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांनी यासंदर्भात सोमवारी (22 एप्रिल) फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

विनाश दिलीप घोजगे (रा. आंबी, तळेगाव दाभाडे, एमआयडीसी, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अर्जुन कांबळे यांच्या ओळखीचा अविनाश घोजगे हा प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. कांबळे यांनी प्लॉट घेण्याची इच्छा व्यक्त केल्यावर घोजगे याने त्यांना आळंदी येथे एक प्लॉट दाखविला. तो प्लॉट पसंत पडल्यानंतर बुकिंगसाठी पाच लाख रूपये देण्याचे ठरले. कांबळे यांनी विश्वासाने वेळोवेळी बँक खाते आणि गुगलपेव्दारे एकूण पाच लाख पाच हजार रूपये घोजगे याच्या बँक खात्यावर वर्ग केले.

पैसे मिळाल्यावर घोजगे याने ना प्लॉट दिला, ना घेतलेली रक्कम परत केली. वारंवार मागणी करूनही घोजगे टाळाटाळ करत असल्याने कांबळे यांनी पोलिसांत धाव घेतली व तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर कांबळे यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कांबळे यांनी 22 एप्रिल 2026 रोजी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...