Wednesday, January 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPM Narendra Modi : "काँग्रेसच्या माथ्यावरून आणीबाणीचे पाप कधीच..."; संविधानावरील विशेष चर्चेत...

PM Narendra Modi : “काँग्रेसच्या माथ्यावरून आणीबाणीचे पाप कधीच…”; संविधानावरील विशेष चर्चेत पंतप्रधान विरोधकांवर कडाडले

नवी दिल्ली | New Delhi

दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू असून संसदेत संविधानाला (Constitution) ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान संसदेत (Parliament) आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार भाषण केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संविधानावर त्यांचे मत व्यक्त करत काँग्रेससह माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह आदी नेत्यांवर कडक शब्दांत हल्लाबोल केला.

- Advertisement -

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीलाच संविधान सभेचे सदस्य असलेले राजश्री पुरुषोत्तमदास टंडन यांच्या एक वाक्य सांगितले. ते म्हणाले, “राजश्री पुरुषोत्तमदास टंडन म्हणाले होते की, शतकानंतर आमच्या देशात एकदा पुन्हा अशी बैठक बोलावली गेली आहे की आम्हाला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण येते. जेव्हा आम्ही स्वतंत्र होतो तेव्हा सभा आयोजित केल्या जायच्या. ज्यात विद्वान लोक देशातील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यास येत असे”, असे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरं वाक्य संविधान सभेचे सदस्य डॉ.राधाकृष्णन यांचं सांगितलं. ते म्हणाले, “या महान राष्ट्रासाठी गणतांत्रिक व्यवस्था नवीन नाहीय. आमच्या येथे हे इतिहासाच्या सुरुवातीपासूनच आहे.” असं म्हणत त्यांनी भारतात पूर्वापार चालत आलेल्या लोकशाही व्यवस्थेचा दाखला दिला. शेवटी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य सांगितलं. “भारताला लोकशाही व्यवस्था माहीत नव्हती, असं नाही. भारतात पूर्वीपासून अनेक गणतंत्र व्यवस्था होती”, हे आंबेडकरांचे विधानही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत वाचून दाखवले.

पुढे ते म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर (Independence) विकृत मानसिकतेने एकतेवर आघात केला. त्यामुळे काँग्रेसच्या माथ्यावरील संविधानाची गळचेपी करण्याचा कलंक कधीच मिटणार नाही. संविधानाच्या निर्मितीच्या काळात मोठे लोक होते. साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता, शिक्षण तज्ज्ञ, स्वातंत्र्य सैनिक आणि समाजातील प्रत्येक वर्गातील लोक होते. सर्वच लोक भारताच्या एकतेच्या प्रति एकरूप होते. देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेले लोक होते. मात्र, काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हतोडा मारत आणीबाणीच्या (Emergency) काळात मनमानी कारभार केला”, असा प्रहार त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, “विविधतेत एकता ही भारताची ताकद आहे. आपल्या देशाची प्रगती विविधतेत एकता साजरी करण्यावर आहे. पण गुलामीची मानसिकता असलेल्या लोकांनी, विविधतेत विरोधाभास शोधत आहे. एवढेच नव्हे तर विविधतेचा आमूल्य आपला खजिना आहे. त्याला सेलिब्रेट केलं पाहिजे होतं. पण त्यात विष पेरण्याचं काम केलं. देशातील एकतेवर घाला घालण्याचा प्रयत्न होता. पण आपल्याला विविधतेते एकता आणावी लागेल. हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) खरी श्रद्धांजली ठरेल”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तसेच “जर इतिहासाकडे मागे वळून पाहिले तर देश संविधानाचे २५ वर्ष पूर्ण करत होता तेव्हा देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. संविधानाची व्यवस्था नष्ट करण्यात आली. देशाला जेल बनवण्यात आले. लोकांचे अधिकार हिसकावून घेतले. पत्रकारांचे अधिकार हिरावून घेतले. काँग्रेसच्या माथ्यावर लागलेलं हे पाप कधी पुसणार नाही. जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा काँग्रेसच्या (Congress) पापाची चर्चा होईल. संविधान निर्मात्यांची मेहनत मातीत मिळवण्याचा प्रयत्न झाला. हे कधीच विसरले जाणार नाही”, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या