मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आणि केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra Tour) आले होते. त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील महायुती सरकारचे (Mahayuti Government) तोंडभरून कौतुक करत सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला.
हे देखील वाचा : सात राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा डंका; भाजपाचा दारूण पराभव
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “महाराष्ट्राच्या सर्व बंधु-भगिनींना माझा नमस्कार. आज मला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी तीस हजार कोटींच्या प्रकल्पासाठी भूमिपूजन आणि लोकार्पणाची संधी मिळाली. या प्रकल्पांमुळे मुबंई आणि आजूबाजूच्या परिसरातील कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल. यात रोड आणि रेल्वेव्यतिरिक्त महाराष्ट्रातील नवतरुणांना कौशल विकासासाठी खूप मोठी योजनाही समाविष्ट आहे. यातून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
हे देखील वाचा : विधानपरिषदेच्या निकालानंतर अजित पवारांची दिल्लीवारी; अमित शाहांची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबतं?
मोदी पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास व शक्तीशाली वर्तमान आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी असून त्यास जगाची आर्थिक कॅपिटल बनवण्याचे माझे लक्ष्य आहे. आमचे सरकार पुढील २५ वर्षात भारताला विकसीत बनवणार असून मुंबईसह उपनगरांमधला प्रवास सोपा होणार. वारकऱ्यांसाठी पालखी मार्गाचे काम वेगाने सुरु होणार आहे. तसेच आमच्या काळात मुंबई मेट्रोचे जाळं वाढले”, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
हे देखील वाचा : “आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी तर कुणाला…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप
तसेच “गेल्या एक महिन्यापासून मुंबई देश विदेश गुंतवणुकांच्या उत्सवाची साक्षीदार बनली आहे. लहान मोठ्या गुंवणूकदारांनी आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्मचं उत्साहाने स्वागत केलं आहे. लोकांना माहीत आहे की एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकेल. स्थायित्व देऊ शकतं. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी म्हटलं होतं की तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तिप्पट वेगाने काम करणार आहे. आणि आज आम्ही हे होताना पाहु शकत आहे”, असेही मोदी म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा