Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशविस्तारवादाचे युग संपले ; पंतप्रधान मोदींचा चीनला इशारा

विस्तारवादाचे युग संपले ; पंतप्रधान मोदींचा चीनला इशारा

लेह – आता विस्तारवादाचे युग संपले असून विकासवादाचे युग आले आहे, असा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला इशारा दिला आहे. शुक्रवारी अचानक पंतप्रधान मोदी यांनी लडाख येथील निमू भागाचा दौरा केला आणि येथील सैनिकांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधला आणि त्यांचे मनोबलही वाढवले.

- Advertisement -

भारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे, आपले आयुष्य वेचले आहे. संपूर्ण जगाने आपल्या जवानांचा पराक्रम पाहिला आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानेच मानवतेचा विनाश केला आहे. आता विस्तारवादाचे युग संपले असून जग विकासाकडे वाटचाल करत आहे, जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानेच मानवतेचा विनाश करण्याचे काम केले. ज्यांना विस्तारवाद हवा आहे, त्यांनी कायम जागतिक शांतीपुढे धोका निर्माण केला. अशी विस्तारवादी भूमिका घेणार्‍या शक्तींचा पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या. यासाठी इतिहास साक्ष आहे. संपूर्ण जग आज विस्तावादाविरोधात एकवटले आहे असेही ते म्हणाले.

तुमचे शौर्य, भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही करत असलेले समर्पण हे अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठिण काळात आणि ज्या उंच ठिकाणी भारतमातेची ढाल बनून उभे आहात त्याची तुलना जगातल्या कशाचीच होऊ शकत नाही. तुमचे साहस, तुमचे शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षा मोठेआहे, असे मोदी यावेळी म्हणाले. तुमचे बाहू इथल्या पर्वतरांगांसारखेच बळकट आहे. तुमची इच्छाशक्तीही अटळ आहे, मी हा सगळा अनुभव घेतो आहे. त्याचेच प्रतिबिंब माझ्या भाषणात शब्दरुपाने उतरले आहे, असे म्हणत त्यांनी जवानांचे मनोबल बाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच सीमाभागात पायाभूत सुविधांसाठी पूर्वीपेक्षा तीन पट अधिक खर्च करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या