Thursday, July 23, 2026
Homeक्राईमCrime News : पोखर्डी शिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर छापा

Crime News : पोखर्डी शिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर छापा

21 जण पकडले || 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तालुक्यातील पोखर्डी शिवारात सुरू असलेल्या कोंबड्यांच्या अवैध झुंजीवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून 21 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत जुगारासाठी वापरलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. रविवारी (29 मार्च) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोखर्डी गावाजवळील पिंपळगाव-उजनी रोडवरील मोकळ्या जागेत कापडी मंडप टाकून कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली.

- Advertisement -

या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. तेथे काही व्यक्ती कोंबड्यांच्या झुंजी लावत असून उपस्थितांपैकी काहीजण त्या झुंजींवर पैशांची बाजी लावत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे 24 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम बोध, आशरफ खान, मोहम्मद शेख, अमजद मगदुम, सय्यद अक्तर, रोहित गोहिल, संदिप कुडीया, राम क्षत्रिय, अजहर शेख, योगेश छजलांनी, संतोष गोयल, विकी सुजगोहर, जितेंद्र म्हात्रे, अमीन शेख, तुषार संतोष मुलतांनी, समीर शेख, वसीम शेख, गोविंद राजुडीया, सोहेल सय्यद, उत्तम साळवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : रामकुंड परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोघांची थरारक सुटका

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati गोदावरी नदीला (Godavari River) आलेल्या पुरामुळे रामकुंड येथील गांधी तलाव परिसरात अडकलेल्या दोन जणांची स्थानिक जीवरक्षक दल, पंचवटी विभागीय अग्निशमन...