Friday, May 3, 2024
Homeजळगावलॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक होत असल्याने शासनाकडून राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सकाळी 11 वाजेनंतर शहरात फिरणार्‍यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. तसेच लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पोलिसांकडून शेकडो वाहन चालकांंवर कारवाई देखील करण्यात आली.

राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने बे्रक द चेन अंतर्गत राज्य शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

यात अत्यावश्यक सेवांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सकाळी 11 वाजेनंतर पोलिसांनी सर्व दुकाने बंद केली.

त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे स्वत: रस्त्यावर उतरून त्यांनी पोलिसांचा चौका चौकात बंदोबस्तासाठी उपस्थित असलेलया पोलीस कर्मचार्‍यांचा आढावा घेत परिस्थिती जाणून घेतली.

रिकामटेकड्यांना दिला चोप

पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी मागविण्यात आली आहे. ही तुकडी शहरातील टॉवर चौक, स्वातंत्र्य चौका, काव्यरत्नावली चौक यासह मुख्य चौकात बंदोबस्तासाठी लावण्यात आली आहे.

या पोलिसांकडून येणार्‍या जाणार्‍यांची संपुर्ण चौकशी करुनच त्यांना सोडले जात होते. शहरात विनाकारण भटकणार्‍यांना पोलिसांकडून चांगलाच चोप दिला जात होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या