नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
प्रिंटरद्वारे पाचशेच्या नोटांची (Five hundred Notes) नक्कल काढून बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी (Ambad Police) अटक (Arrested) केली आहे. तर एक जण फरार झाला आहे…
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अशोक अण्णा पगार (४५, मु. पो. मेंढी ता. सिन्नर जि. नाशिक) हा नकली नोटा (Fake Notes) चलनात आणणार असून त्याकामी तो येणार असल्याची माहिती भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली. यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक के.टी. रौंदळे, अंमलदार किरण गायकवाड, संदीप भुरे, सागर जाधव, राहुल जगझाप, घनश्याम भोये ,सुचितसिंग सोळुंके, राकेश पाटील,पवन परदेशी, तुषार मते, प्रवीण राठोड, सचिन करंजे यांचे पथक तयार करून माऊली लॉन्स (Mouli Lawns) येथे सापळा रचला.
हे देखील वाचा : Nashik Crime News : माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर प्राणघातक हल्ला; दोघे गंभीर
यावेळी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पगारे हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी (Police) त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपये किंमतीच्या बनावट तीस नोटा मिळून आल्या. यावरून पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता सदर गुन्ह्यात हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे व भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये सदर बनावट नोटा बनवल्याचे सांगितले.
यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांचे दोन तपास पथके तयार करून संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे (३२,रा.सेक्टर नंबर १०, आनंद निवास, प्लॉट नंबर १०१, पहिला मजला, वाशी, नवी मुंबई) यास नाशिक मधून अटक केली. तर नंदकुमार तुकाराम मुरकुटे (५२, रा. संजीवनी हॉस्पिटल मागे, सोनार गल्ली,ता. सिन्नर ,जि. नाशिक ) यास सिन्नर येथून सापळा रचून अटक केली. तर चौथा संशयित भानुदास वाघ (रा. नांदूर शिंगोटे) हा फरार झाला आहे. दरम्यान संशयितांनी आतापर्यंत किती नोटांची छपाई केली व कोठे वितरित केल्या आहेत व यापूर्वी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या नोटांचा वापर झाला आहे का? यासह आदी बाबींचा पोलीस आता शोध घेत आहेत.