Sunday, May 5, 2024
Homeनाशिकभरतीच्या तयारीला लागा! पाेलिस आयुक्तालय भरणार ११८ रिक्त पदे; 'या' तारखेपासून नाेंदणी

भरतीच्या तयारीला लागा! पाेलिस आयुक्तालय भरणार ११८ रिक्त पदे; ‘या’ तारखेपासून नाेंदणी

नाशिक। प्रतिनिधी

पाेलिस दलातील १७ हजार रिक्त जागा भरण्याचे सूताेवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशकातील एमपीए येथे केले हाेते. त्यानुसार या जागा भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसह विविध अॅकेडमीत पाेलिस भरतीचा सराव करणाऱ्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच शहर पोलिस भरतीच्या प्रक्रियेला अखेर मंजुरी मिळाल्यानंतर रिक्त पदांचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिस शिपाई पदाच्या ११८ जागांवर भरती प्रक्रिया हाेणार आहे.

- Advertisement -

येत्या पाच मार्चपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात होत आहे. बावीस लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरात सरासरी हजार नागरिकांमध्ये एक पोलिस कर्मचारी असल्याने वारंवार मनुष्यबळवाढीची मागणी आहे. त्यानुसार सन २०२३ मध्ये रिक्त असलेल्या ११८ पदांची भरती घेण्यात येत आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत.

दरम्यान, आयुक्तालयातील पोलिस आणि प्रशासकीय विभागात तीन हजार ४०५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११८ पोलिस अंमलदारांची पदे रिक्त आहेत. तर अनुकंप तत्वावरील अनेक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या सात वर्षांपासून नाशिक शहरात भरती प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती. करोनापूर्वी मुंबई व इतर जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीअंतर्गत दीडशे ते दोनशे अंमलदार नाशिकमध्ये नियुक्त झाले होते. त्यामुळे रिक्त पदे भरण्यात अडथळे येत होते. आता पदे रिक्त असल्याने तिथे इच्छुक उमेदवारांना अर्ज नोंदविता येणार आहे.

नाशिक शहर भरती – २०२४

प्रवर्ग – रिक्त जागा

खुला ५०

आर्थिकदृष्ट्या दुर्बल – २०

ओबीसी – २

विशेष मागास – ४

अनुसूचित जमाती – २३

अनुसूचित जाती – १९

एकूण – ११८

-५ ते ३१ मार्च कालावधीत ऑनलाइन अर्ज

– वेबसाइट – policerecruitment2024.mahait.org

– भरतीसाठी हेल्पलाइन : ०२५३-२३०५२३३ किंवा २३०५२३४

– सर्व पोलिस घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा

– उमेदवाराला एकाच ठिकाणी एका पदाकरीता अर्ज नोंदवता येणार

– भरतीसाठी कोणीही पैशांची किंवा अन्य मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या