Wednesday, June 10, 2026
HomeनगरAhilyanagar : 36 पोलीस चालकांच्या प्रशासकीय बदल्या

Ahilyanagar : 36 पोलीस चालकांच्या प्रशासकीय बदल्या

पोलीस अधीक्षक घार्गे यांचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यातील 36 चालक पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. येथील पोलीस मुख्यालयात बुधवारी (4 जून) दुपारी बदली दरबार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये या बदल्या करण्यात आल्या आहेत. रात्री उशिरा याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश काढले आहेत.

- Advertisement -

तात्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या काळात जिल्ह्यातील प्रशासकीय बदलीपात्र पोलीस अंमलदार, चालक पोलीस अंमलदार यांचे तीन पसंती ठिकाणांसह अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, ओला यांची मुंबई येथे बदली झाली व सोमनाथ घार्गे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून जिल्ह्यात रूजू झाले. त्यांनी पदभार हाती घेताच सुमारे पावणे चारशे पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या केल्या होत्या. दरबार आयोजित करून प्रत्येक अंमलदारांना त्यांच्या पसंती ठिकाण विचारात घेऊन बदली देण्यात आली होती. दरम्यान, पोलीस चालक अंमलदार यांच्या बदल्या अद्याप झाल्या नव्हत्या. त्यासाठी प्रशासकीय बदलीपात्र चालकांना बुधवारी येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बोलविण्यात आले होते.

अधीक्षक घार्गे, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अमोल भारती यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील 36 पोलीस चालकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक 1, चालक सहायक फौजदार 2, चालक पोलीस हवालदार 7, चालक पोलीस नाईक 2 व चालक पोलीस शिपाई 24 यांचा समावेश आहे. दरम्यान, बदली झालेल्या चालक पोलीस अंमलदारांना तात्काळ बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश अधीक्षक घार्गे यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणूक : अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा महायुतीचे उमेदवार नरेंद्र...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikनाशिकमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (िद.१०) मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अखेर महायुतीचे...