Tuesday, October 27, 2026
Homeनगरपोलीस पाटलांना थकीत मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा

पोलीस पाटलांना थकीत मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा

156 कोटी 24 लाखांचा निधी वितरीत करण्यास मान्यता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटलांना खुशखबर आहे राज्यातील पोलीस पाटलांचं रखडलेलं मानधन देण्यासाठी 156 कोटी 24 लाखांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने काल जारी केले. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील पोलीस पाटलांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील पोलीस पाटलांचे मे ते ऑगस्ट 2024 या चार महिन्यांचे मानधन रखडलेलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

त्यामुळे राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटील चार महिन्यांपासून ‘बिन पगारी, फुल अधिकारी’ बोलण्याची वेळ पोलीस पाटलांवर आली होती. पण आता हे मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्या

MLC Election 2026 : नागपूरात मतपत्रिकांवरून आक्षेप, अमरावतीत ‘जुनी पेन्शन’चा मजकूर;...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस (Vote Counting) सुरुवात झाली आहे. टपाली मतांच्या...