Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यासुषमा अंधारे, विनायक राऊत, भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा; काय आहे प्रकरण?

सुषमा अंधारे, विनायक राऊत, भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा; काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गट या दोन गटांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. एकमेकांच्या गटातील नेतेमंडळींवर जाहीर टीका करण्यात दोन्ही गटाचे नेते आघाडीवर असल्याचे कायमच दिसून आले आहे.

- Advertisement -

पण आता या दोन गटांमधील संघर्षाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील ८ नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यता आल्याची माहिती समोर येत आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतनात रविवारी पार पडलेल्या महाप्रबोधन यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य, भाषणे करत शिंदे यांची प्रतिमा मलीन केली, तसेच इतर राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत शिंदे गटाचे नेते बाळा गवस यांनी तक्रार दाखल केली होती.

त्या आरोपावरून शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, अनिता बिर्जे, आमदार भास्कर जाधव, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख आणि समालोचक सचिन चव्हाण यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, विविध प्रसार माध्यमांकडून महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभेतील वक्ते म्हणून खासदार राजन विचारे, मी स्वतः, आमदार भास्कर जाधव खासदार विनायक राऊत, आणि आमच्या अनिताताई बिरजे यांच्यावरती 153 अ नुसार गुन्हे दाखल झाल्याचे कळतं आहे. मात्र अजूनही माझ्याकडे रीतसर याची प्रत मिळालेली नाही.

महाप्रबोधन यात्रेतील सगळी भाषण पब्लिक डोमेनमध्ये आहेत. ती तपासून घेता येतील मला खात्री आहे त्यातलं एकही वाक्य हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे आणि त्याचा सन्मान राखणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तरी सुद्धा 153 अ अर्थात चितावणीखोर वक्तव्य या सबबीखाली दाखल झालेला गुन्हा हा आमच्या महाप्रबोधन यात्रेच्या सुरुवातीचा शुभशकुन आहे असा आम्ही समजतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या