Sunday, July 7, 2024
Homeक्राईमNashik Crime News : कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका; एकास अटक

Nashik Crime News : कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका; एकास अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

आडगाव शिवारातील एका शेतात पत्र्याच्या खोलीत कत्तलीच्या उद्देशाने डांबलेल्या गोवंश जातीच्या तेवीस जनावरांची (Animals) आडगाव पोलिसांनी सुटका केली आहे.पथकाने छापा मारुन १ लाख ६४ हजार रुपयांची जनावरे ताब्यात घेतली.याप्रकरणी रशिद ईस्माईल सैय्यद (वय ५०, रा. जुना पाझर तलाव, आडगाव शिवार) या संशयिताला अटक (Arrested) केली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : म्हसरूळला रिक्षाचालकाची हत्या

अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक करण्यासह डांबून ठेवण्याच्या प्रकारांवर नजर ठेवत धडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार ज्ञानेश्वर कहांडळ, निखील वाघचौरे, इरफान शेख व अमोल देशमुख यांना गस्तीदरम्यान गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना कळविल्यानंतर उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त नितीन जाधव यांच्या सूचनेनुसार सापळा रचण्यात आला.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ

त्यानंतर सहायक निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक प्रवीण दाइंगडे, मयूर निकम, सहायक उपनिरीक्षक अभिमन्यू गायकवाड, अशोक वस्ते, अंमलदार सुरेश नरवडे, दिनेश गुंबाडे यांच्या पथकाने आडगाव शिवारातील शिंदे वस्ती रस्त्यावरील एका शेतातल्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला. तिथे निर्दयीपणे, दाटीवाटीने गोवंश जातीचे २३ जनावरे पथकाला दिसली. त्यामध्ये गायी व गोऱ्यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : अखेर ‘त्या’ रिक्षाचालकाच्या हत्येचा उलगडा

दरम्यान, जनावरे ताब्यात घेत संशयिताविरुद्ध आडगाव पोलिसांनी (Adgaon Police) प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधनियम व महाराष्ट्र प्राणी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तर संबंधित जनावरे पोलिसांनी (Police) गोशाळेत रवाना केली आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : कट्टा विक्री आले अंगलट; सराईताकडून दोन गावठी पिस्तूल जप्त

दोन गोऱ्यांची सुटका

इंदिरानगर पोलिस ठाण्याचे अंमलदार दीपक पाटील यांच्या पथकाने वडाळा गाव परिसरात छापा टाकला. पिकअप वाहनासह गोवंश जातीचे दोन गोऱ्हे ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी समीर इस्माल शेख (वय २२, रा. भैय्यावाडी, रंगरेज मळा) याला अटक करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या