Sunday, October 18, 2026
Homeदेश विदेशझारखंडमध्ये पोलिसांचा आंदोलनकांवर लाठीचार्ज अन् पाण्याचा मारा; विद्यार्थी काटेरी कुंपण भेदून विधानभवनाबाहेर

झारखंडमध्ये पोलिसांचा आंदोलनकांवर लाठीचार्ज अन् पाण्याचा मारा; विद्यार्थी काटेरी कुंपण भेदून विधानभवनाबाहेर

रांची | Ranchi
झारखंडची राजधानी रांचीमध्ये JPSC आणि JSSC भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी, १० ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घालत आंदोलन केले. हजारो विद्यार्थी जुन्या विधानसभेपासून नव्या विधानसभा भवनाच्या दिशेने निघाले. आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त, बॅरिकेडिंग आणि काटेरी तारांचे कुंपण उभारले होते. मात्र, विद्यार्थ्यांनी एकापाठोपाठ अनेक बॅरिकेड्स तोडत विधानसभा परिसराच्या दिशेने कूच केले. त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांसह लाठीचार्ज केला. पुढे अश्रुधुराचा वापर झाल्याचेही वृत्त आहे.

काटेरी तारांचे कुंपण भेदून विद्यार्थी पुढे
विद्यार्थ्यांचा मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाने सुमारे चार किलोमीटरच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था केली होती. काटेरी तारांचे कुंपण आणि अनेक स्तरांवर बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. सुमारे १,५००हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

मात्र, आंदोलक विद्यार्थ्यांनी सुरुवातीचे बॅरिकेड पार केल्यानंतर पुढे जात राहिले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी सहा बॅरिकेड्स पार केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी वॉटर कॅननचा वापर केला. तरीही विद्यार्थी मागे हटले नाहीत. काही आंदोलक शेतातून मार्ग काढत विधानसभा परिसराच्या मागील भिंतीजवळ पोहोचल्याचेही वृत्त आहे.

पाण्याचा मारा, त्यानंतर लाठीचार्ज
पोलिसांनी वॉटर कॅननचा मारा केल्यानंतरही आंदोलक पुढे सरकत राहिले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे सांगत पोलिसांनी लाठीचार्ज केला. काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने चप्पल आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्याचेही समजत आहे. या कारवाईदरम्यान काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, लाठीचार्जनंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.

आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही
या कारवाईसंदर्भात बोलताना रांचीचे पोलीस प्रमुख पारस राणा म्हणाले, “पोलिसांनी वारंवार समज देऊनही आंदोलक ऐकण्यास तयार नव्हते. ते बैरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.” तसेच, “पोलीस विद्यार्थ्यांच्या विरोधात नसून प्रशासन त्यांच्या मागण्यांबाबत संवेदनशील आहे,” असेही त्यांनी सांगितले.

शरद पवार गटाच्या खासदारांची आज PM मोदींसोबत महत्त्वाची बैठक; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

‘डोक्यावर लाठ्या मारल्या’चा आंदोलकांचा आरोप
लाठीचार्जनंतर काही आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईवर गंभीर आरोप केले. पोलिसांनी आंदोलन नियंत्रणात आणताना बळाचा वापर केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांचे डोके, हात आणि चेहऱ्यावर लाठ्या मारल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांमध्ये राज्य सरकार आणि पोलिसांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

नऊ दिवसांपासून उपोषण करणारे देवेंद्र नाथ महतोही आंदोलनात
या आंदोलनाचे आणखी एक प्रमुख आकर्षण ठरले ते विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो. गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणावर असतानाही ते आंदोलनात सहभागी झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अॅम्ब्युलन्समधून विधानसभा मार्चमध्ये आणण्यात आले. काही वृत्तांनुसार, ते स्ट्रेचरवरूनही आंदोलनात सहभागी झाले.

आयोगाच्या तीन सदस्यांचा राजीनामा
दरम्यान, जेपीएससीमध्ये एक मोठा प्रशासकीय बदलही झाला आहे. आयोगाचे तीन सदस्य अजिता भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हंसदा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. तिन्ही सदस्यांनी राज्यपालांकडे आपले राजीनामे सादर केले असून, ते स्वीकारण्यात आले आहेत. यापूर्वी, 22 जुलै रोजी जेपीएससीचे अध्यक्ष एल. खियांगटे यांनीही राजीनामा दिला होता. सध्या, जेपीएससी भरती परीक्षांमधील अनियमिततेच्या आरोपांची सीआयडी चौकशी करत आहे. या संदर्भात आयोगाच्या सदस्यांची चौकशी केली जात आहे. डॉ. अजिता भट्टाचार्य यांची 10 ऑगस्ट रोजी चौकशी होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
JPSC आणि JSSCच्या विविध भरती परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये:

संबंधित भरती परीक्षा रद्द करण्याची मागणी
कथित गैरप्रकारांची CBI चौकशी करण्याची मागणी
भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे
परीक्षा पद्धतीत सुधारणा
दोषींवर कठोर कारवाई

ताज्या बातम्या

Accident News : तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; ५...

0
बीड | Beed बीड जिल्ह्यातील (Beed District) माजलगाव तालुक्यात (Majalgaon Taluka) खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळ आज (रविवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण...