Monday, September 28, 2026
Homeराजकीयरोहित पवार यांनी केली सरकारवर जोरदार टीका; म्हणाले, दुष्काळाच्या मुद्द्यात..

रोहित पवार यांनी केली सरकारवर जोरदार टीका; म्हणाले, दुष्काळाच्या मुद्द्यात..

मुंबई । Mumbai

कोरड्या दुष्काळाची घोषणा करताना ज्या उपाययोजना सरकारने जाहीर केल्या त्याही कोरड्याठाक आहेत. २६५ तालुक्यात आज पहिला ट्रिगर लागू केला असला तरी किमान तीन आठवडे आधी हे ट्रिगर लागू करायला हवे होते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी केली. राज्य सरकारने आज २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. सरकारच्या या निर्णयावर रोहित पवार यांनी आज ‘एक्स’ या समाज माध्यमातून नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

एकीकडं १९७२ च्या दुष्काळाहून अधिक गंभीर दुष्काळ असल्याचं मुख्यमंत्री महोदय सांगतात आणि दुसरीकडं मात्र उपाययोजना करताना मोघम उपाययोजना करतात. शेतकऱ्यांना शेतसारा आणि विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ होणार आहे. शेतसारा किती असतो २०० रुपये, परीक्षा फी किती असते ५०० ते १००० रुपये. मुख्यमंत्री साहेब संवेदनशील असाल तर परीक्षा फी नाही तर शैक्षणिक फी माफ करा, शेतसारा नाही तर पीककर्ज माफ करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या गोष्टी होणार नसतील तर मुख्यमंत्र्यांचा दौरा केवळ दिखावा होता किंवा मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचं दुःखच कळलं नाही असं म्हणावं लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने वेळकाढूपणा केला, तत्काळ भरीव मदत जाहीर केली नाही तर राज्यभर शेतकरी आणि शेतमजुरांच्या सोबतीने जनआंदोलन उभारून सरकारला मदत देण्यास भाग पाडू, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...