जळगाव | Jalgaon
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती डॉ.प्रांजल खेवलकर (Dr. Pranjal Khewalkar) हे पुण्यातील (Pune) उच्चभ्रू खराडी भागातील स्टे बर्ड गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सापडले आहेत.
पोलिसांनी (Police) या छाप्यात खेवलकर यांच्यासह दोन पुरुष आणि तीन महिलांना (Woman) ताब्यात घेतले आहे. तर पार्टीदरम्यान अमली पदार्थ, दारू व हुक्का मोठ्या प्रमाणावर पोलिसांना आढळून आला आहे. या घटनेनंतर वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून, डॉ. प्रांजल खेवलकर कोण आहेत? याची चर्चा राजकीय (Political) वर्तुळात रंगली आहे.
हे देखील वाचा : Pune Rave Party Raid : पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई; रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंचा जावई रंगेहाथ पकडला
कोण आहेत डॉ. प्रांजल खेवलकर?
रोहिणी खडसे यांनी पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर खडसे व खेवलकर कुटुंबिय नात्यात बांधले गेले. डॉ.प्रांजल हे रोहिणी यांचे बालपणीचे मित्र होते. प्रांजल हे डॉक्टर असून, त्यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. साखर उद्योगाशी संबंधित कंपनीशीही खेवलकर यांचा संबंध आहे. एक ट्रॅव्हल कंपनीही खेवलकर यांच्या नावावर असल्याचे सांगितले जाते. लग्नानंतर (Marriage) डॉ. प्रांजल आणि रोहिणी पुण्यामध्ये वास्तव्यास होते.
एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल याने आत्महत्या केल्यानंतर खडसे कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रांजल व रोहिणी मुक्ताईनगरला वास्तव्यास आले. डॉ. प्रांजल यांना दोन मुली आहेत. खडसे कुटुंबिय राजकारणात असले तरी खेवलकर हे राजकारणापासून चार हात दूरच असतात. मात्र, खडसे कुटुंबीयांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे प्रांजल खेवलकर काहीवेळा अडचणीतही आले आहेत. खडसेंचे भाजपाशी बिनसल्यानंतर स्वतः खडसेंसोबतच खडसे कुटुंबीय आणि त्यांच्या दोन्ही जावयांवर आरोप झाले आहेत.
हे देखील वाचा : Girish Mahajan : नाथाभाऊंचा जावई रेव्ह पार्टीत सापडला, गिरीश महाजनांनी थेट कोंडीत पकडलं; म्हणाले, “पार्टीचे आयोजक खडसेंचे…”
डॉ. प्रांजल खेलवलकरांची सोनाटा लिमोझिन ही आलिशान कार काही वर्षांपूर्वी वादात सापडली होती. या कारची चुकीची नोंदणी झाल्याचा आरोप करून कार जप्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. दमानिया यांनी प्रांजल यांची एमएच १९ एक्यू ७८०० ही सोनाटा लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा केला होता. ही कार नियमबाह्य पद्धतीने रूपांतरित करण्यात आली होती.
जळगाव आरटीओमध्ये या गाडीची नोंदणी झाली असून, गाडीला पासिंग मिळाली आहे. मात्र, या आलिशान गाडीची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. हलक्या वाहनांच्या श्रेणीत या कारची नोंदणी करण्यात आली होती. शिवाय, अॅम्बेसिडर लिमोझिन कारव्यतिरिक्त अन्य लिमोझिन कारना देशात परवानगी नसल्याचा दावाही दमानिया यांनी केला होता. प्रांजल यांच्या या लिमोझिन वरूनही एकनाथ खडसेंना आरोपांच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले होते.





