Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPolitical News : "बाप-लेकीला बाजूला राहू द्या, तुम्ही इकडे या"; शरद पवारांच्या...

Political News : “बाप-लेकीला बाजूला राहू द्या, तुम्ही इकडे या”; शरद पवारांच्या खासदारांना अजित पवार गटाकडून ‘ऑफर’

मुंबई | Mumbai

मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) प्रचंड बहुमत मिळाले. तर, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) धुव्वा उडाला.२३७ जागांवर घवघवीत यश मिळाले. तर महाविकास आघाडीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच त्याआधी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळाल्याने त्यांनी केंद्रात सरकार बनवले. तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

- Advertisement -

यात लोकसभा निवडणुकीत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने १० जागा लढवून तब्बल ८ जागांवर विजय मिळविला. तर विधानसभा निवडणुकीत ८६ जागांपैकी अवघ्या १० जागांवर विजय मिळाला. त्यामुळे शरद पवार व अजित पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पडद्यामागे हालचाली सुरु असून त्यांनी शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group ) खासदारांना आपल्या गटात येण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,”राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तब्बल सात खासदारांना संपर्क केल्याचे बोलले जात आहे. तटकरे यांनी सात खासदारांना आमच्यासोबत सत्तेत सामील व्हा, मात्र याबद्दल इतक्यात कोणालाही काही सांगू नका, असे सांगितले. मात्र, या सातही जणांनी ऑफर धुडकावली असल्याचे समजते. तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाचे नेते “आमच्या खासदारांना सांगत आहेत की, ‘बापाला आणि मुलीला बाजूला राहू दे, तुम्ही आमच्यासोबत या”, असे त्यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी आपल्याला आलेली ऑफर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कानावर घातली. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना फोन करून नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. तर शरद पवारांनी या नेत्यांना यापुढे असे प्रयत्न न करण्यास बजावले असल्याचे बोलले जात आहे. “असं झालं असतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक पक्षफूट पाहायला मिळाली असती. त्यामुळे शरद पवारांनी या घडामोडी अत्यंत गांभीर्याने घेतल्या”, असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या घडामोडींवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दोन्ही गट एकत्र येण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. ते म्हणले की, “आम्ही केंद्रात एनडीए आघाडीत आहोत. महाराष्ट्रातही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीला राज्यात मोठं बहुमत आहे. आमचं धोरण स्पष्ट आहे. आम्ही सरकारसोबत राहणार आहोत आणि यावर कोणताही पुनर्विचार केला जात नाही”, असे तटकरेंनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या