Wednesday, September 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNCP News : अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात लावणीचा कार्यक्रम; महिलेने धरला 'या'...

NCP News : अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात लावणीचा कार्यक्रम; महिलेने धरला ‘या’ गाण्यांवर ठेका

नागपूर | Nagpur

येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) (NCP) कार्यालयात दिवाळी (Diwali) मिलन कार्यक्रमानिमित्त लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एका महिलेने “मला इशकाच्या झुल्यात झुलवा, वाजले की बारा या गाण्यावर ठेका धरला. ज्याला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दाद दिली. तसेच यामुळे संपूर्ण वातावरण उत्साही झाले. मात्र, आता या लावणीवरून नवा वाद देखील निर्माण झाला आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादीच्या पक्ष (अजित पवार) कार्यालयात सदर महिला शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसमोर लावणीचा (Lavani) ठेका धरत नृत्य करतांना दिसत आहे. ज्याठिकाणी राजकीय चर्चा होतात त्याच ठिकाणी दिवाळी मिलनाच्या निमित्ताने लावणीचे नृत्य झाल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या व्हिडिओवर (Video) स्पष्टीकरण देतांना नागपूरचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर (Anil Ahirkar) म्हणाले की, “दिवाळीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी दिली,” असे त्यांनी सांगितले. तसेच लावणी सादर करणारी महिला पक्षाचीच एक पदाधिकारी असल्याचा दावाही अहिरकर यांनी केला आहे.
.

ताज्या बातम्या

पडसाद : आत्मविश्वास की वास्तवाशी फारकत?

0
नाशिक / शैलेंद्र तनपुरे - दै. देशदूत - संपादक बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशी एक आव्हान देणारी उक्ती मराठी भाषेत आहे....