Tuesday, October 13, 2026
Homeमुख्य बातम्याRahul Gandhi : "दोनशे अधिकारी आमच्या संपर्कात, ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाही...

Rahul Gandhi : “दोनशे अधिकारी आमच्या संपर्कात, ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाही तोपर्यंत…”; राहुल गांधींचा केंद्र सरकारला इशारा

नवी दिल्ली | New Delhi

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्याविरोधात इंडिया आघाडीसह कॉकरोच जनता पार्टीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. मात्र, पोलिसांकडून इंडिया आघाडीच्या खासदारांसह आंदोलकांची धरपकड केली जात आहे. त्यानंतर इंडिया आघाडीकडून ज्ञानेश कुमारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

त्या पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) इंडिया आघाडीकडून दुपारी तीन वाजता सर्वोच्च न्यायालयावर (Supreme Court) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याआधी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पत्रकार परिषद घेत ज्ञानेश कुमार आणि पंतप्रधान मोदींसह पोलिसांच्या (Police) वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दिल्लीला एखाद्या किल्ल्यासारखे स्वरुप

यावेळी राहुल गांधी म्हणाले की,”आम्ही दिल्लीत आंदोलन करत असताना सरकारने रस्त्यावर हजारो पोलीस तैनात केले आहेत.त्यामुळे दिल्लीला एखाद्या किल्ल्यासारखे स्वरुप प्राप्त झाले आहे. हे करून सरकारने मोठी चूक केली असून, आम्हाला हेच हवे आहे. मोदी आणि त्यांचे लोक ज्ञानेश कुमारांना अभय देत आहेत. आम्ही राजीनामा मागत आहोत, तरी ते राजीनामा घेत नाहीत”, असे त्यांनी म्हटले.

आंदोलक महिलांना आरएसएस आणि भाजपचे गुंड मारहाण करतायत

पुढे ते म्हणाले, “लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मोर्चा काढत आहोत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे.तुम्ही आम्हाला किती दिवस अडवणार आहात. परंतु, आम्ही आता थांबणार नाही. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या चोराला का वाचवले जात आहे? असा थेट सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. तसेच दिल्लीतील आंदोलक महिलांना आरएसएस आणि भाजपचे गुंड मारहाण करत आहेत. या संदर्भातील अनेक व्हिडिओ आणि पुरावे उपलब्ध आहेत. ज्ञानेश कुमार यांच्याबाबत सर्व माहिती आपल्याकडे आहे, असेही राहुल गांधींनी म्हटले.

ज्ञानेश कुमारांची परिस्थिती काय हे आम्हाला माहिती

आम्हाला सगळीकडून माहिती मिळत असून, ज्ञानेश कुमारांची काय परिस्थिती आहे हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही, घाबरू नका आम्ही तुम्हाला सोडणार नाही. लाखो लोक रस्त्यावर उतरले असून, तुमच्या स्वभावाबाबत ते विचारत आहेत. तुमच्यासमोरही काही लोक आहेत. त्यांना हटवण्यासाठी आम्हाला तुम्हाला हटवायचे आहे. त्यामुळेच आमचे आंदोलन सुरू आहे, असेही राहुल गांधी म्हणाले

२०० अधिकारी आमच्या संपर्कात

केंद्र सरकारमधील २०० अधिकारी आमच्या संपर्कात असून, ते आम्हाला सर्व माहिती देत आहेत, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला.तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी आम्हाला भेटण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आम्ही आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

राजाभाऊ

नाशिकच्या मातीतून जागतिक व्यासपीठापर्यंत; खासदार राजाभाऊ वाजेंचे मायभूमीत जल्लोषात स्वागत

0
नाशिक | प्रतिनिधीनाशिक शहराच्या स्थानिक प्रश्नांना संसदेच्या सभागृहात सातत्याने वाचा फोडणारे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेच्या (UNGA-81) निमित्ताने...