Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधींना मोठा दिलासा; अखेर 'त्या' प्रकरणाची...

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधींना मोठा दिलासा; अखेर ‘त्या’ प्रकरणाची अंतिम समाप्ती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लोकसभेचे (Loksabha) विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मानहानी प्रकरणाचा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अंतिम निपटारा झाला आहे. या प्रकरणाची संपूर्ण कार्यवाही समाप्त झाली आहे, अशी माहिती जेष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे यांनी दिली.

- Advertisement -

या प्रकरणामध्ये सुरुवातीला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने प्रक्रिया (इश्यू प्रोसेस) काढण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाविरुद्ध राहुल गांधी यांच्या वकिलांकडून फौजदारी पुनरावलोकन अर्ज नाशिक सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयाने (Court of Session) सदर पुनरावलोकन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर पुनरावलोकन अर्ज अंशतः मंजूर करत प्रक्रिया काढण्याचा आदेश रद्द केला. तसेच न्यायदंडाधिकारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयास मूळ फौजदारी अर्जामध्ये प्रक्रिया काढण्याच्या प्रश्नाचा नव्याने विचार करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नव्याने सुरू केलेल्या कारवाईत सरकारवाडा पोलीस स्टेशन (Sarkarwada Police Station) यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २०२ अन्वये अहवाल न्यायालयासमोर ठेवण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराने स्वतःहून सदर तक्रार मागे घेतली. त्यानुसार अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, नाशिक, श्रीमती. नरवाडिया यांनी सदरील प्रकरण तक्रारदाराने मागे घेतल्यामुळे निकाली काढले आहे. परिणामी सदर प्रकरणाचा कायदेशीररित्या संपूर्णतः शेवट झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांच्यावतीने जेष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे, ॲड. गजेंद्र सानप, ॲड. अविनाश गाढे, ॲड. सिद्धार्थ जाधव, ॲड. हुजेफा सय्यद, ॲड. सानिका ठाकरे यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अणि सत्र न्यायालयात बाजू मांडली. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विनाकारण बदनाम करण्याकरता अशा प्रकारचे खटले विविध भागात दाखल केले जातात. परंतु, हा देश संविधानावर चालणारा आहे. त्यामुळे न्यायालयात (Court) अशा लोकांना थारा मिळत नाही, असे नाशिक शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष आकाश छाजेड यांनी सांगितले.

कुठलाही कायदेशीर आधार व तथ्य नसल्यामुळे या प्रकरणांमध्ये आधीच पुनरावलोकन अर्जामध्ये माननीय न्यायालयाने निकाल दिल्यानंतर व त्यानंतर चौकशी करण्यासाठी कुठलाही आधार अथवा सत्यत्या आढळून न आल्यामुळे फिर्यादीने याबाबतची फिर्याद मागे घेतली असावी.

ॲड. जयंत जायभावे

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...