Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGirish Mahajan : तपोवनातील वृक्षतोडीला ठाकरे बंधूंचा विरोध, मंत्री महाजनांनी केलं मोठं...

Girish Mahajan : तपोवनातील वृक्षतोडीला ठाकरे बंधूंचा विरोध, मंत्री महाजनांनी केलं मोठं विधान; म्हणाले, “तर राज-उद्धव यांच्याशी…”

नागपूर | Nagpur

पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे होणार्‍या सिंहस्थासाठी साधू-महंतांच्या निवासाकरिता तपोवनातील तब्बल १८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. मात्र ही झाडे तोडण्याला पर्यावरणवादी, अनेक सामाजिक संघटना, अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही, असा इशारा या नेत्यांकडून देण्यात आला आहे. आज (सोमवारी) अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेत तपोवनातील वृक्षतोडीबाबत चर्चा केली. तपोवनातील वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत गरज पडल्यास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे विधान केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; तपोवनातील वृक्षतोडीबाबत चर्चा, बैठकीत नेमकं काय ठरलं?

YouTube video player

मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांना नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान तपोवनातील वृक्षतोडीला होत असलेल्या विरोधाबाबत विचारले असता ते म्हणाले, “साधूग्रामसाठी तपोवनातील एकही जुने झाडं आम्ही तोडणार नाही. उलट नाशिकमध्ये पंधरा हजार झाडे रिप्लांट करून लावणार आहोत. मात्र, काही जी छोटी मोठी झाडे आहेत, ती कापावी लागतील. याप्रश्नी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी सुद्धा चर्चा करेल. त्यांचे जे काही आक्षेप असतील त्यावर चर्चा करू. वृक्षप्रेमी आणि राजकीय नेत्यांची जी भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे.अगोदर आम्ही या वृक्षप्रेमींना (Tree) १५ हजार झाडे दाखवू. त्यानंतरच आम्ही पुढे जे काही करायचे आहे त्याबाबत निर्णय घेऊ. सयाजी शिंदे यांच्यासोबत सुद्धा माझी चर्चा झाली असून, त्यांची भूमिका समजून घेतली आहे”, असे त्यांनी म्हटले.

नाशिकमध्ये करण्यात येणार १५ हजार देशी झाडांची लागवड

तपोवनातील (Tapovan) वृक्षतोडीला होत असलेला विरोध आणि पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक शहरातील विविध ठिकाणी तब्बल १५ हजार झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हैदराबादमधील राजमुद्री येथून अंदाजे १५ फूट उंचीची सुमारे १५ हजार देशी झाडे आणण्यात येणार आहे. यात लिंब, जांभूळ, आंबा, पिंपळ, वडसह आदींचा समावेश असून, या झाडांची देखभाल मनपा उद्यान विभागामार्फत ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर करून केली जाणार आहे.यातील पहिली एक ते दोन हजार झाडे येत्या आठवड्यात नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....