Sunday, June 14, 2026
Homeमुख्य बातम्याRaj Thackeray : मुख्यमंत्री फडणवीसांसोबत 'वर्षा'वरील भेटीत काय झालं? राज ठाकरेंनी सर्वच सांगितलं

Raj Thackeray : मुख्यमंत्री फडणवीसांसोबत ‘वर्षा’वरील भेटीत काय झालं? राज ठाकरेंनी सर्वच सांगितलं

नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (गुरुवारी) सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. दोघांमध्ये जवळपास ५० मिनिटे चर्चा झाली. तसेच या भेटीमुळे राजकीय (Political) वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर फडणवीसांची भेट का घेतली? याचे कारण राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सांगितले.

- Advertisement -

यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, “गेल्या अनेक दिवसांपासून आपण फक्त कबुतरं आणि हत्तांमध्ये अडकलो आहे. यामुळे आपल्या मूलभूत समस्यांकडे आपलं लक्ष नाही. गेले काही महिन्यांत मी मुख्यमंत्र्यांशी (CM) एक दोन वेळा भेटलो. महत्त्वाच्या विषयावर बोलत होतो. साधारणपणे त्याचा आराखडा कसा करता येईल यावर चर्चा होती. २०१४ मध्ये अस्थेटिक या विषयावर मी १६ मिनिटांची डॉक्युमेंट्री केली होती. ती इतर भाषेतही करत आहे. टाऊन प्लानिंग आणि इतर गोष्टी आवडीचे विषय आहेत. मी जे सांगतो त्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही. त्यामुळे सांगणं गरजेचे आहे. नाही तर लोकांची मते घेत बसाल” असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “एका स्कॉटिश साहित्यिकाचे चांगलं वाक्य आहे. तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातात सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मी ते वाक्य बदलू इच्छितो. तुमच्याकडच्या ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा. मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मुंबई, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरात मोठ्या प्रमाणावर रिडेव्हल्पेंटची कामे सुरू आहेत. अनधिकृत गोष्टीही सुरू आहेत” असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

तसेच “आज जिथे ५० लोक राहत होती. त्याठिकाणी ५०० लोक राहत आहेत. माणसे वाढली, गाड्या वाढल्या ट्रॅफिक वाढले. सर्व गोष्टी रस्त्यावर आल्या. पार्किंग लॉट उभे करायला हवेत, या समस्यांवर तोडगा काढला नाही, तर कठीण आहे. याचा आराखडा मी मुख्यमंत्र्यांना दिला. रोज या शहरावर माणसं येऊन आदळत आहेत, रस्ते नाहीत, नुसत्या उंचच उंच इमारती बांधल्या जात आहेत, रस्ते बांधणं हा धंदा झाला असून, वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणावी, नको तिथे भीती घालतात, अर्बन नक्षलवादापेक्षा याकडे लक्ष द्या”, असेही राज ठाकरे यांनी सुनावले.

ताज्या बातम्या

चिमुकल्यांच्या स्वागतासाठी प्रशासकीय अधिकारी उद्या शाळांमध्ये

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik उन्हाळी सुटीच्या आनंदी आठवणींची शिदोरी घेऊन चिमुकली पावले पुन्हा एकदा ज्ञानमंदिराच्या उंबरठ्यावर सोमवारपासून येणार आहेत. या नव्या शैक्षणिक पर्वाच्या मंगल...